इस्त्रायल-इराण युद्धाचा भडका! आता कपडे, जोडे आणि बांगड्याही महागणार; पाहा काय-काय होणार महाग?

Israel iran war impact on india : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता केवळ पेट्रोल-डिझेलपुरता मर्यादित राहिलेला नाही. या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट चटके आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहेत. 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'मधील तणावामुळे कच्च्या मालाची आवक घटली असून अनेक उद्योगांमध्ये हाहाकार माजला आहे.

Israel iran war impact on india

दैनंदिन वापरातील ७३ वस्तूंच्या किमतीत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या एका आठवड्यात रोजच्या वापरातील ७३ वस्तूंचे दर वधारले आहेत. काही वस्तूंच्या किमतीत तर ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या ५०% कच्चे तेल आणि ५५% एलएनजीसाठी (LNG) पश्चिम आशियावर अवलंबून असल्याने महागाईचा हा डोंगर अधिक मोठा होत आहे.

काय काय महाग होणार? (प्रमुख क्षेत्रांवर परिणाम)

कपडे आणि फॅशन: कपड्यांच्या छपाईसाठी आणि रंगासाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल्सच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पॉलिस्टर : १५ टक्क्यांनी महागले असून पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकचा खर्च दुप्पट झाला आहे. यामुळे येत्या काळात कपड्यांच्या किमती वाढणे अटळ आहे.

जोडे, बेल्ट आणि लेदर: प्लास्टिक आणि लेदर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या 'एक्रिलिक ॲसिड'च्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम बूट, चप्पल आणि बेल्डच्या किमतींवर होईल.

काचेच्या वस्तू आणि बांगड्या: गॅस पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता असल्याने काच उद्योग संकटात आहे. फिरोजपूरमधील बांगडी उत्पादकांच्या मते, उत्पादन खर्च वाढल्याने हातातील बांगड्यांच्या किमतीही वाढू शकतात.

बांधकाम आणि पोलाद : स्टील उत्पादनासाठी लागणाऱ्या 'कोकिंग कोल'च्या किमतीत १०% वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने खाणकाम आणि वाहतूक महागली आहे, ज्यामुळे घर बांधणे आता अधिक खर्चिक होणार आहे.

ऑटोमोबाईल आणि प्लास्टिक: गाड्यांचे सुटे भाग आणि फायबरग्लास बनवण्यासाठी वापरले जाणारे 'मॅलिक एनहाइड्राइड' तब्बल ६१ टक्क्यांनी महागले आहे.

रुपयाची घसरण आणि वाढता बोजा

भारतीय रुपया सध्या प्रति डॉलर ९२ रुपयांच्या आसपास आहे. रुपया कमकुवत होत असल्याने आयातीचा खर्च वाढत आहे. भारताची आयात अवलंबित्व आणि युद्धामुळे होणारा विलंब यामुळे भारतीय बाजारपेठेत महागाईचा मोठा ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(Disclaimer): ही बातमी उपलब्ध आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. युद्धाच्या परिस्थितीनुसार किमतींमध्ये बदल होऊ शकतो.

हेही वाचा : अमेरिका इराण युद्धावर रोज 'एवढे' कोटी करतोय खर्च! 10 दिवसांत पाकिस्तानच्या संरक्षण बजेट इतका खर्च

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+