Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युद्धाच्या सावलीत चर्चेची आशा! अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने; ओमानमध्ये रंगणार मुत्सद्देगिरीचा थरार

US Iran Meeting in Oman : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या ढगांखाली अखेर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचा मार्ग मोकळा झाला आहे. रद्द होण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही उच्चस्तरीय बैठक आता शुक्रवारी ओमानची राजधानी मस्कत येथे पार पडणार आहे. जागतिक राजकारणाच्या दृष्टीने या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

US Iran Talks

तुर्कीयेऐवजी ओमान : ठिकाण का बदलले?

ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन' नुसार, ही बैठक आधी तुर्कीयेमध्ये नियोजित होती. मात्र, काही तांत्रिक आणि राजनैतिक कारणांमुळे शेवटच्या क्षणी ठिकाण बदलून ते ओमानमध्ये निश्चित करण्यात आले.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावरून या वृत्ताला दुजोरा दिला असून, शुक्रवारी सकाळी 10 वाजता चर्चेला सुरुवात होईल असे स्पष्ट केले. ओमानने मध्यस्थाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

वादाचे मुख्य मुद्दे: मागण्या आणि अडथळे

दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येणार असले तरी, अजेंड्याबाबत प्रचंड मतभेद आहेत. यामुळेच बुधवारी ही चर्चा फिस्कटते की काय, अशी चिन्हे दिसत होती.

१. अमेरिकेची आक्रमक भूमिका

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, ही चर्चा केवळ अणुकार्यक्रमापुरती मर्यादित नसावी. अमेरिकेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत, इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, आखातातील सशस्त्र गटांना इराणकडून मिळणारा पाठिंबा व इराणमधील मानवाधिकार आणि स्वतःच्या नागरिकांना मिळणारी वागणूक या गोष्टीवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.

२. इराणचा ठाम नकार

दुसरीकडे, इराणने आपले पत्ते स्पष्ट केले आहेत की, आम्ही केवळ अणु मुद्द्यांवरच चर्चा करू," असे इराणने ठामपणे सांगितले आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे किंवा प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असून, युरेनियम समृद्ध करण्याचा अधिकार कायम राखण्यावर त्यांनी भर दिला आहे.

ट्रम्प यांचा इशारा आणि अरब देशांची मध्यस्थी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने "खूप काळजी घ्यावी," असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवून इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असूनही, ही चर्चा सुरू होण्यामागे अरब आणि मुस्लिम देशांची मोठी भूमिका आहे. व्हाईट हाऊसने चर्चेतून बाहेर पडू नये, असे आवाहन या देशांनी केले होते, ज्याचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी पुन्हा वाटाघाटीचे टेबल स्वीकारले आहे.

रशियाची भूमिका आणि युरेनियमचा प्रश्न

इराण आपला युरेनियम साठा निर्यात करण्यास तयार नाही. अशा स्थितीत रशियाने इराणचे युरेनियम साठवण्याचा जुना प्रस्ताव पुन्हा एकदा सक्रिय केला आहे. इराणचा अणुकार्यक्रम लष्करी हेतूंसाठी नाही, हे जगाला पटवून देण्याचे मोठे आव्हान आता अराघची यांच्यासमोर असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+