Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आधी ट्रम्पंशी चर्चा, आता भारतात येणार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की! काय आहे कारण? जाणून घ्या

Ukrainian President Zelensky will come to India : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की लवकरच भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. युक्रेनचे भारतातील राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी याबाबत स्पष्टता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर झेलेन्स्की हे भारतात येणार आहेत. अद्याप त्यांच्या भेटीची तारीख निश्चित झाली नसली, तरी दोन्ही देशांमध्ये याबाबत काम सुरू आहे आणि लवकरच ती जाहीर होण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त एका वृत्तसंस्थेशी (ANI) बोलताना राजदूत पोलिशचुक म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही पक्ष यावर काम करत असून, आम्हाला आशा आहे की राष्ट्राध्यक्ष लवकरच भारत दौरा करतील. यामुळे भारत आणि युक्रेन यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील."

Ukrainian President Zelensky will come to India

शांतता चर्चेत भारताची महत्त्वाची भूमिका

राजदूत पोलिशचुक यांनी स्पष्ट केले की युक्रेन शांतता चर्चेत भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानतो, विशेषतः रशियासोबतच्या संबंधांमध्ये. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध समाप्त करण्यासाठी भारताने सातत्याने आग्रह धरला आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या योगदानाची युक्रेनला आशा आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या "हा युद्धाचा काळ नाही" या वक्तव्याचाही संदर्भ

पोलिशचुक यांनी पुढे म्हटले की, भारताचे धोरण शांततापूर्ण उपाय आणि संवादाला प्रोत्साहन देते. भारत शांतता आणि समन्वयाचे समर्थन करतो. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इतर भागीदारांसोबत भारतही चर्चा करेल, याला युक्रेनचा पाठिंबा आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या "हा युद्धाचा काळ नाही" या वक्तव्याचाही संदर्भ दिला. भारत या प्रकरणात तटस्थ नसून, तो शांतता आणि संवादाचा पुरस्कर्ता आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या भूमिकेचे महत्त्व

एकीकडे अमेरिका युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण अमेरिकेचे हे प्रयत्न किती विश्वासार्ह आहेत, हे दोन्ही देशांना चांगलेच माहीत आहे. यामुळे युक्रेन अमेरिकेवर पूर्ण विश्वास ठेवतोच असे नाही. याउलट, भारताचे धोरण समन्वय साधणारे आणि जागतिक शांततेसाठी काम करणारे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांचा हा दौरा भारतासाठी विशेष ठरू शकतो. भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता, या युद्धातून तोडगा काढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, अशी आशाही युक्रेनला असू शकते.

हेही वाचा : पंतप्रधान सोडा..आधी भारताच्या राजदुतांनीच ट्रम्प यांना ठणकावले! 4 मुद्यात जाणून घ्या, काय म्हणाले ते

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+