पाकड्यांची झोप उडाली! सुखोई सुपरजेट SJ-100 आता भारतातच बनणार;HALची या रशियन कंपनीसोबत डील!
HAL UAC agreement Sukhoi Superjet India production : भारताने जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकले आहे. 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण करार करत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची प्रमुख विमान निर्मिती कंपनी पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) यांनी सुखोई सुपरजेट एसजे-100 (Sukhoi Superjet SJ-100) हे नागरी प्रवासी विमान आता भारतातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मॉस्को येथे या ऐतिहासिक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी करण्यात आली.
हा करार केवळ तांत्रिक सहकार्य नसून, भारताच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी देणारा आहे. दुसरीकडे, एवढा मोठा करार झाल्याने आता पाकिस्तानची झोप उडल्याशिवाय राहणार नाही, कारण या डीलमुळे भारताची आर्थिक शक्ती वाढणार आहे.

SJ-100 विमानाची वैशिष्ट्ये
सुखोई सुपरजेट एसजे-१०० हे एक अत्याधुनिक ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी प्रवासी विमान आहे.
- प्रवासी क्षमता : अंदाजे १०० प्रवाशांची क्षमता
- उड्डाण रेंज : सुमारे ३,००० किलोमीटर
- उपयोग : हे विमान विशेषतः देशांतर्गत (डोमेस्टिक) उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे, जे लहान आणि मध्यम अंतराच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
- जागतिक वापर : जगभरात २०० हून अधिक SJ-100 विमाने तयार करण्यात आली असून १६ हून अधिक एअरलाईन कंपन्या त्यांचा वापर करत आहेत.
'उडान' योजनेला मिळणार नवी दिशा!
काही तज्ज्ञांच्या मते, भारतात SJ-100 विमानाचे उत्पादन सुरू झाल्यामुळे देशाच्या प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेला ('उडान' - उडे देश का आम नागरिक) मोठा फायदा होणार आहे.
'उडान' योजनेअंतर्गत देशातील लहान शहरे आणि गावे हवाई नेटवर्कशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. एसजे-१०० सारखे विमान, जे प्रादेशिक मार्गांसाठी उपयुक्त आहे, ते या योजनेसाठी 'गेम-चेंजर' ठरू शकते.
या करारानंतर, एचएएलला भारतात एसजे-१०० विमानांच्या निर्मितीचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. हा प्रकल्प भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाईल.
रोजगाराच्या प्रचंड संधी
हा प्रकल्प केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा आहे. विमान निर्मितीशी संबंधित सुटे भाग (Components) उत्पादन. विमान देखभाल (Maintenance) सेवा.पुरवठा साखळी (Supply Chain) व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. हे भारताच्या उत्पादन क्षेत्राला (Manufacturing Sector) आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देईल.
भारत-रशिया संबंधांना बळकटी!
भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण भागीदारी अनेक दशकांपासून मजबूत आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील हे नवीन सहकार्य दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना अधिक दृढ करेल. रशियाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा आणि भारताच्या उत्पादन क्षमतेचा मेळ घालून हा प्रकल्प दोन्ही राष्ट्रांसाठी 'विन-विन' स्थिती निर्माण करणारा आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या प्रादेशिक प्रवासाच्या दृष्टिकोनात एक मोठे परिवर्तन घडून येईल आणि देशाची तांत्रिक व औद्योगिक क्षमता जागतिक पटलावर अधिक ठळकपणे दिसून येईल. तर दुसरीक,डे पाकिस्तानची झोप उडवणारा हा करार ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications