"या" देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान
Pm Modi Nigeria Visit- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. ते ज्या देशात जातात तेथे त्यांना भेटण्यासाठी लोकांचा गराडा पडतो. विविध देशांचे प्रमुख मोदींचे व्यक्तिगत मित्र आहेत. विविध देशांनी आपला सर्वोच्च नागरी सन्मान देऊन मोदींचा गौरव केला आहे. आता या देशांमध्ये आणखी एका देशाची भर पडली आहे. या देशानेही आपला सर्वोच्च नागरी सन्मान देऊन मोदींचा गौरव केला आहे.
मोदी ठरणार दुसरी विदेशी व्यक्ती
नायजेरिया हा आफ्रिकी खंडातील देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर" हा सन्मान देऊन गौरवान्वित करणार आहे. यापूर्वी हा सन्मान महाराणी एलिझाबेथ यांना देण्यात आला होता. हा पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे त्यांच्या नंतरचे दुसरे विदेशी व्यक्ती आहेत. तसेच कोणत्याही अन्य देशाने मोदी यांना दिलेला हा सतरावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियाचे राष्ट्रपती अहमद टिनू यांच्या निमंत्रणानुसार तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर पहिल्या टप्प्यात नायजेरिया ला पोहोचले. गेल्या सतरा वर्षात भारतीय पंतप्रधानांनी नायजेरियाचा दौरा करण्याची ही पहिली वेळ आहे.

विश्वासाची चावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियाच्या अबुजा येथे गेले. तेथील मंत्री वाईक यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अबुजा शहरातील चावी भेट दिली. ही चावी नायजेरियाच्या जनतेकडून मोदींना देण्यात आलेल्या विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते.
I look forward to welcoming Prime Minister Narendra Modi on his first visit to Nigeria, which is also the first visit by an Indian Prime Minister to our dear country since 2007.
— Bola Ahmed Tinubu (@officialABAT) November 16, 2024
Our bilateral discussions will seek to expand the strategic partnership between both countries and…
नायजेरियात उत्साही स्वागत
पंतप्रधान मोदी यांचा पश्चिम आफ्रिकेतील हा पहिला दौरा आहे. या दौऱ्यात ते नायजेरिया ब्राझील आणि गयाना या देशांना भेट देतील. नायजेरियातून ते ब्राझीलला जातील."मी भारतीय समुदाय आणि नायजेरियातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. तेथील भारतीय नागरिकांनी अत्यंत उत्साहाने मला संदेश पाठविले आहेत" असे मोदी म्हणाले. "नायजेरियाचा हा दौरा विविध क्षेत्रातील आमची भागीदारी मजबूत करण्याची संधी आहे आणि आमचे परस्पर संबंध लोकशाही आणि बहुमताच्या आधारावर आहेत", असे मोदी यांनी नमूद केले. नायजेरियात झालेल्या उत्साही स्वागतामुळे पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले आणि दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होण्याची अशा व्यक्त केली.
मराठी भाषिकांकडून सन्मान
नायजेरियातील मराठी भाषिकांनी अत्यंत उत्साहाने नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्यात आले. या मराठी मंडळींनी घेतलेली भेट आणि दिलेल्या सन्मानपत्राची छायाचित्रे नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंट वर प्रसिद्ध केली आहेत.
जी 20 परिषदेत मांडणार भूमिका
गयाना आणि ब्राझील या दोन्ही देशांत दरम्यान मोदी परस्पर संबंध बद्दल चर्चा करणार आहेत आणि जी 20 शिखर परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका मांडतील. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओ येथे जी 20 परिषद होत असून हा मोदींच्या दौऱ्याचा मुख्य कार्यक्रम असेल.












Click it and Unblock the Notifications