Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

येत्या 25 वर्षात भारतात मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढणार! भारत सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र होईल

Pew Research Report : येत्या 25 वर्षात म्हणजेच 2050 पर्यंत भारतात मुस्लिम लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकेल आणि जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले राष्ट्र बनणार आहे. प्यु रिसर्च सेंटरच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

जगात ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांची संख्या जास्त आहे, तुलनेत ज्यू, हिंदू, पारशी, बौद्ध आणि इतर धर्मीयांची संख्या तुलनेत कमी आहे. भारतात बहुसंख्य हिंदू जरी असले तरीही जगातील बहुतांश राष्ट्रात मुस्लीम धर्मीयांच्या तुलनेत हिंदुंची संख्या कमीच आहे. अशातच प्यू रिसर्च सेंटरचा एक अहवाल आला आहे, त्यात 2050 पर्यंत विविध धर्मीयांच्या लोकसंख्येबद्दल अहवाल देण्यात आला आहे.

Pew Research Report

गेल्या काही वर्षांत, काही अपवाद वगळता जवळपास सर्वच धर्मांच्या अनुयायांची संख्या वाढली आहे. तुलनेत हिंदुंची संख्या नेपाळ, भारतात वाढत आहे पण इतर देशात मात्र ती हवी तितकी आहे असे नाही. प्यू रिसर्च सेंटरने आपल्या अहवालात जागतिक धार्मिक प्रोफाइल आणि धर्माच्या अनुयायांची संख्या बदलत असल्याचे अधोरेखित केले आहे.

2015 मध्ये प्रसिद्ध झालेला, अहवाल 2050 पर्यंतचा ट्रेंडचा विचार केल्यास प्रजनन दर आणि प्रमुख धर्मांमधील तरुण लोकांचे प्रमाण या बाबी धर्मावर आधारित लोकसंख्येतील बदलांवर प्रभाव टाकत आहेत. याव्यतिरिक्त, लोक वारंवार त्यांचा धर्म बदलत आहेत. धर्मांतरामुळेही विविध धर्मांच्या लोकसंख्येत बदल दिसत आहेत.

मुस्लीमांची संख्या ख्रिश्चनांच्या बरोबरीने होणार!

प्यु रिसर्चच्या अहवालानुसार, येत्या काही दशकांमध्ये ख्रिश्चन धर्म हा सर्वात जास्त प्रमाणात पाळला जाणारा धर्म राहील, परंतु मुस्लिम लोकसंख्या सर्वात वेगाने वाढेल. हे कायम राहिल्यास 2050 पर्यंत मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांच्या बरोबरीने होईल.

भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढणार

प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत भारतात मुस्लिम लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होईल. भारत इंडोनेशियाला मागे टाकेल आणि जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असेल. अहवालात असेही म्हटले आहे की भारत हा हिंदू धर्माचा गड राहील, पुढील 25 वर्षांत हिंदू लोकसंख्या वाढतच जाईल. याव्यतिरिक्त, जगभरात बौद्धांची संख्येत कोणतेही परिवर्तन होण्याची शक्यता नाही असा उल्लेख त्यात आहे.

जगाच्या लोकसंख्येत 10 टक्के मुस्लीमांची लोकसंख्या असेल

प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, येत्या 25 वर्षांत जगभरात ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या जवळपास इस्लामचे पालन करणाऱ्यांइतकीच असेल. युरोपमध्ये, पुढील अडीच दशकांत, मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या प्रदेशात इस्लामचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढेल. तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये कोणत्याही धर्माशी संबंध न ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. 2050 पर्यंत, यूएस मधील ख्रिश्चन लोकसंख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+