Pakistan News : युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान झाला कंगालपणा आला जगासमोर! जागतिक बँकेकडूनपोलखोल
Pakistan's Economy Health and Educational Backward Exposed : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण राबवणे सुरु केले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सिंदूर ऑपरेशनद्वारे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने आतंरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरले आणि आर्थिक मदतीची याचना केली. त्यानंतर नाणेनिधीनेही त्यांना अटी-शर्तीवर आर्थिक मदत केली.
पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, लाहोर आणि इतर शहरावर भारताने हवाई हल्ले करुन पाकिस्तानचे लष्करी आर्थिक नुकसान केले. आधीच पाकिस्तानमध्ये अन्नधान्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे वांदे आहेत, त्यातच युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला सिंदूर ऑपरेशनही परवडले नाही, त्यानंतर आयएमएफकडे भीकेचा कटोरा त्यांनी पुढे केला.

या सर्व गोष्टीतून पाकिस्तान किती आर्थिक खाईत लोटलेला आहे आणि त्यांचे कंगालपण दिसून येते पण आता जागतिक बँकेनेच त्यांच्या कंगालपणाचे दर्शन जगाला घडवले आहे.
पाकिस्तान किती गरीब - जागतिक बँकेचा अहवाल
पाकिस्तानात गरीबांची संख्या फार मोठी आहे, अशातच द इफेक्ट्स ऑफ टॅक्सेस अँड ट्रान्सफर्स ऑन इनइक्विलिटी एंड पाॅवर्टी इन पाकिस्तान या शिर्षकाखाली जागतिक बँकेचा एक अहवाल आला आहे. जागतिक बँकेने या अहवालात पाकिस्तान किती गरीब आहे आणि तेथील वाईट स्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. हा अहवाल पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र द डॉनमध्ये प्रकाशित झाला आहे.
कसा कंगाल आहे पाकिस्तान?
- जागतिक बँकेच्या या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये वाढत्या गरिबीचे सर्वात मोठे कारण म्हणजे सामान्य विक्री कर (जीएसटी) हा आहे.
- पाकिस्तानमध्ये, जीएसटी पेमेंट करपूर्व खर्चाच्या 7 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळेच खालच्या वर्गातील लोकांना गरिबीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
- अहवालानुसार, पाकिस्तानमधील असमानतेवर दुसरा सर्वात मोठा प्रभाव म्हणजे पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणावरील खर्च हा आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाची स्थिती वाईट
- या अहवालात पाकिस्तानमधील सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाच्या वाईट स्थितीबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी, पाकिस्तानने शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांवर खर्च वाढवावा असे अहवालात सुचवले आहे.
- याशिवाय, अहवालात गरीब कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मासिक रोख मदत योजनेचेही कौतुक करण्यात आले आहे.
- सर्वात गरीब कुटुंबांना मासिक रोख मदत देणारा बेनझीर इन्कम सपोर्ट प्रोग्राम (BISP) उत्पन्नातील असमानता दूर करण्यात सर्वात मोठा घटक बनत आहे.
हेही वाचा : असीम मुनीरने पाकिस्तान PM शरीफ यांना काढले वेड्यात! भारतावर हल्ला, चीन सैन्याचा फोटो, नेमकं प्रकरण?
हेही वाचा : मोठी बातमी! 48 तासांतच पाकिस्तान हतबल; जागतिक बँकेकडे पसरले हात, मागितली कर्जाची भीक!












Click it and Unblock the Notifications