असीम मुनीरने पाकिस्तान PM शरीफ यांना काढले वेड्यात! भारतावर हल्ला, चीन सैन्याचा फोटो, नेमकं प्रकरण?
Pakistan News : फील्ड मार्शल म्हणून निवड झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रविवारी एका डिनरचे आयोजन केले होते. पंतप्रधान शाहबाज शरीफ ते राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो यांच्यापर्यंत, राजकारण आणि लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी या डिनर पार्टीला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात असीम मुनीर यांनी शाहबाज शरीफ यांना भेट दिलेल्या एका फोटोवरुन नवा वाद निर्माण झालेला आहे.
कार्यक्रमात असीम मुनीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक छायाचित्र भेट दिले. हा फोटो त्याला भेट म्हणून देण्यात आला होता की तो पाकिस्तानने अलिकडेच भारतावर केलेल्या हल्ल्याचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, भेट देण्यात आलेला हा फोटो मुळात 2019 या सालातील आहे. शाहबाज शरीफ यांना दिलेला हा पाच वर्षे जुना फोटो चिनी सैन्याचा आहे, जो अनेक वेळा वापरला गेला आहे.

परंतु, असीम मुनीर यांनी तो फोटो 'ऑपरेशन बन्यान' दरम्यान भारतावरील हल्ल्याचा फोटो म्हणून वर्णन केले जात आहे. परंतु, या फोटोवरुन आता असीम मुनीर यास ट्रोल केले जात आहे. हा फोटो 18 ऑगस्ट 2018 चा आहे. चिनी आर्मी पीएलएच्या 74 व्या ग्रुप अंतर्गत PHL-03 लाँग-रेंज रॉकेट सिस्टीमद्वारे अनेक रॉकेट डागण्यात आले. हे रॉकेट रात्री डागण्यात आले आणि हे चित्र चीनच्या या लष्करी कारवाईचे आहे. असीम मुनीर यांनी आयोजित केलेल्या या पार्टीचा मुख्य उद्देश हा देशाच्या राजकीय नेतृत्वाला आणि पाकिस्तानी सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती.
पहलगाम हल्ला, भारताकडून ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. ७ मे रोजी सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले, त्यानंतर पाकिस्तानने संघर्ष आणखी वाढवला आणि गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमधील लष्करी आणि निवासी क्षेत्रांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. पण यानंतर १० मे रोजी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.












Click it and Unblock the Notifications