पाकिस्तानी जनरल असीम मुनीर पाकिस्तानातून पळाला; बंकरमध्ये लपला, देश सोडून गेला की...? चर्चा वाढल्या
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एका मागून एक चार महत्त्वाच्या बैठका झाल्या. या बैठकींनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला. या बैठकानंतर पाकिस्तानचे नेते आणि लष्करी अधिकारी घाबरले आहेत. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करु शकतो, असे सांगितले जात आहे. त्यातच पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर भुमिगत झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. असीम मुनीर प्रायव्हेट जेमधून पाकिस्तानबाहेर पळून गेला की बंकरमध्ये लपला याबाबतच्या बातम्या सुरु झाल्या आहेत.

काय म्हणतात पाकिस्तानी माध्यमे?
पाकिस्तानी माध्यमांमध्ये चालू असलेल्या बातम्यांनुसार, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भूमिगत झाले आहेत. ते एखाद्या सुरक्षित बंकरमध्ये लपले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा कट जनरल मुनीरशी जोडल्याची बातमी समोर आल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली असल्याचे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की हा हल्ला आयएसआयच्या पाठिंब्याने रचण्यात आला होता आणि त्यात मुनीरची थेट भूमिका होती.
मुनीर यांच्यावर उसळला राग
भारतातील हल्ल्याशी मुनीर यांचे नाव जोडले गेल्यानंतर पाकिस्तानमध्येही जनरल मुनीर यांच्या विरोधात आवाज उठू लागला. तेथील वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी मुनीरच्या कट्टरपंथी आणि प्रक्षोभक विचारसरणीला दोषी ठरवले. भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या मुनीरच्या धोरणाचा आता पाकिस्तानवर परिणाम होत आहे. अनेक तज्ञांनी त्यांची तुलना माजी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्याशी केली आहे. ज्यांनी १९८० च्या दशकात 'ऑपरेशन टोपॅक'द्वारे काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिले होते.
काय म्हणाले होते मुनीर?
अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये जनरल मुनीर म्हणाले होते की, "काश्मीर ही आमची गळ्याची नस आहे. आम्ही त्यासाठी तीन युद्धे लढली आहेत आणि ती विसरणार नाही." या विधानानंतर काही दिवसांनीच पहलगाम हल्ला झाला. ज्यामुळे भारताला कठोर कारवाई करावी लागली. भारतीय लष्कर पूर्णपणे सतर्क आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी कधीही मोठा निर्णय घेऊ शकतात. आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू झाल्याची अटकळ आहे.
असीम कोठे लपला?
मुनीर बेपत्ता झाल्याबद्दल सोशल मीडियावर अनेक दावे समोर आले आहेत. काही जण म्हणतात की तो देश सोडून पळून गेला आहे. काही जण म्हणतात की पाकिस्तानचे लष्करप्रमुख बेपत्ता झाले आहेत. आपल्या जीवाला धोका असल्याच्या भीतीने तो रावळपिंडीतील एका बंकरमध्ये भूमिगत झाल्याचेही वृत्त आहे. या बातम्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अफवांना आणखी बळकटी मिळाली आहे. ज्या अफवांनी X वर #MunirOut हॅशटॅगसह ट्रेंड करणे सुरू ठेवले आहे. काही माध्यमांच्या मते मुनीर आपल्या कुटुंबाला घेऊन प्रायव्हेट जेटद्वारे पाकिस्तान सोडून पळून गेला आहे.












Click it and Unblock the Notifications