Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nobel Prize Medicine 2025: 'या' तीन शास्त्रज्ञांना मेडिसीनचा नोबेल जाहीर; जाणून घ्या त्यांच्याविषयी

Nobel Prize Medicine Winners 2025 : 2025 सालच्या वैद्यकशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञान या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची आज, सोमवारी (६ ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली आहे. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्वपूर्ण कार्य चांगल्या प्रकारे समजून घेणाऱ्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना हा सन्मान मिळाला आहे.

nobel prize 2025

या पुरस्काराचे मानकरी ठरलेले शास्त्रज्ञ पुढीलप्रमाणे आहेत:

  • मेरी ई. ब्रुनको (Mary E. Brunco)

अमेरिकन शास्त्रज्ञ: जीन फंक्शनवर (Gene Function) संशोधन.

  • फ्रेड रॅम्सडेल (Fred Ramsdell)

अमेरिकन शास्त्रज्ञ: रोगप्रतिकारक प्रणालीचे तज्ज्ञ.

  • शिमोन साकागुची (Shimon Sakaguchi)

जपानी शास्त्रज्ञ: टी-पेशींच्या (T-Cells) शोधासाठी प्रसिद्ध.

या तिघांना 'परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेवरील (Peripheral Immune Tolerance)' त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नेमके काय आहे 'परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलता'?

हा शोध वैद्यकीय विज्ञानाला एक नवीन दिशा देणारा ठरला आहे. परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलता म्हणजे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचे असे वर्तन, ज्यामध्ये ती स्वतःच्याच ऊतींवर (Tissues) हल्ला करत नाही.

नेमकं काय कार्य केले?

रोगप्रतिकारक शक्तीचे मुख्य काम विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक पदार्थांशी लढणे हे आहे. मात्र, काही वेळा ही प्रणाली चुकून शरीराच्या अवयवांनाच धोका मानते, ज्यामुळे स्वयंप्रतिकार रोग होतात (उदा. टाईप १ मधुमेह आणि संधिवात).

संशोधनाचे महत्त्व काय?

या संशोधनामुळे ही प्रणाली 'स्व-प्रतिजन' (Self-Antigen, म्हणजे शरीराचे स्वतःचे घटक) ओळखते आणि हानिकारक प्रतिक्रियांना प्रतिबंधित करते, हे सिद्ध झाले आहे. जेव्हा 'टी-सेल' शरीराच्या स्वतःच्या पेशींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ही सहनशीलता ती निष्क्रिय करते किंवा नष्ट करते.

कर्करोग उपचार आणि अवयव प्रत्यारोपणात ठरणार उपयुक्त

नोबेल समितीने नमूद केले आहे की या शास्त्रज्ञांच्या शोधामुळे केवळ स्वयंप्रतिकार रोगांवरच नव्हे, तर इतर अनेक वैद्यकीय क्षेत्रांवरही मोठा परिणाम होणार आहे. रोगप्रतिकार शक्तीच्या कार्यात सुधारणा झाल्यामुळे कर्करोगाच्या उपचारात (Cancer Treatment) मोठी उपयुक्तता सिद्ध होणार आहे. अवयव प्रत्यारोपणानंतर (Organ Transplants) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परदेशी अवयवावर हल्ला करते. हे संशोधन प्रत्यारोपण सुधारण्यास देखील मदत करेल.

नोबेल पुरस्काराचे वितरण कधी?

आजपासून सुरू झालेल्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणेचा हा पहिला टप्पा होता. हा पुरस्कार स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधून दुपारी ३:०० वाजता (स्थानिक वेळेनुसार) जाहीर करण्यात आला विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोना (अंदाजे ९ कोटी रुपये), एक सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळेल. हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. यापुढे भौतिकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थव्यवस्था यासह विविध क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा १३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+