इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी?, इराणचं भविष्य संकटात!
Mojtaba Khamenei injured in Israeli attack : मध्य पूर्वेतील युद्ध आता एका अशा वळणावर येऊन ठेपले आहे, जिथून परतीचा रस्ताच दिसत नाहीये. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नवे 'सुप्रीम लीडर' म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र, ही धुरा खांद्यावर घेताच मोजतबा खामेनी इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली.

सरकारी टीव्हीवरील 'तो' उल्लेख अन् उडाला संभ्रम
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर या युद्धाचे वर्णन "रमजान युद्ध" असे केले जात आहे. 'टाईम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, इराणी अँकरनी मोजतबा खामेनी यांचा उल्लेख "जनाबाज" असा केला आहे. फारसी भाषेत या शब्दाचा अर्थ 'युद्धातील शत्रूच्या हल्ल्यात जखमी झालेली व्यक्ती' असा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी तेहरानवर झालेल्या भीषण इस्रायली हवाई हल्ल्यानंतर मोजतबा खामेनी सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. याच हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून, मोजतबा यांची पत्नी आणि मुलगी देखील मारली गेल्याचे वृत्त आहे.
कोण आहेत मोजतबा खामेनी?
इराणच्या राजकारणात मोजतबा खामेनी हे नाव नेहमीच पडद्यामागून सूत्रे हलवणारे मानले गेले. त्यांनी कधीही अधिकृत सरकारी पद भूषवले नाही, तरीही सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. इराणच्या शक्तिशाली 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) शी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. पाश्चात्य देशांशी सहकार्य करण्याच्या ते विरोधात असून, 2009 मधील निदर्शने दडपण्यात त्यांची मोठी भूमिका होती. २०१९ मध्ये ट्रम्प प्रशासनाने त्यांच्यावर कडक निर्बंध लादले होते.
इस्रायल आणि अमेरिकेचा 'तो' इशारा ठरला खरा?
मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड होताच आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातारण निर्माण झाले. इस्रायल आणि अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की, "इराणचा नवा सर्वोच्च नेता जो कोणी बनेल, त्याला जगाच्या पाठीवर कुठेही शोधून काढून नष्ट केले जाईल.
मोजतबा यांच्या जखमी होण्याच्या वृत्तामुळे हा इशारा इस्रायलने प्रत्यक्षात उतरवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. इराणच्या सत्ता रचनेत अचानक झालेल्या या बदलामुळे आणि नव्या नेत्याच्या प्रकृतीबाबतच्या गोपनीयतेमुळे इराणमध्ये यादवी माजण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
आता पुढे काय?
मोजतबा खामेनी यांची दुखापत किती गंभीर आहे, यावर इराणचे भवितव्य अवलंबून आहे. जर मोजतबा प्रदीर्घ काळ अनुपस्थित राहिले, तर IRGC आणि इतर नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष उडू शकतो. आपल्या सर्वोच्च नेत्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराण इस्रायलवर मोठा प्रतिहल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच कुटुंबातील प्रमुख सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे खामेनी घराण्याची अनेक दशकांची सत्ता धोक्यात आली आहे. सध्या इराण सरकारने त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत मौन बाळगले आहे. मात्र, "जनाबाज" मोजतबा खमेनी पुन्हा जनतेसमोर येतात की इराणला नवा नेता शोधावा लागतो, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.
-
इराण-इस्त्रायल युद्धाच्या रणधुमाळीत भारताचे 'मिशन सुरक्षित समुद्र': नौदलाच्या बाबत घेतला मोठा निर्णय -
अदानी टोटल गॅसकडून CNG आणि घरगुती PNG चे दर स्थिर; काही उद्योगांच्या पुरवठ्यात कपात -
सावधान! महाराष्ट्राचा पारा चढला; पुढील 48 तास उष्णतेचा 'हाय अलर्ट', जाणून घ्या IMDचा अंदाज काय? -
Womens day 2026 wishes quotes : महिला दिनी 'पहिली सुपरवुमन' आईसाठी खास हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल!










Click it and Unblock the Notifications