Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

London plane crash : लंडनमध्ये उड्डाण करताच विमानाचा स्फोट! सेकंदातच प्लेन बनले आगीचा गोळा VIDEO बघा

London plane crash : अहमदाबाद विमान क्रॅश झाल्याची थरारक आणि भीषण घटना आजही अंगावर काटा आणते. या घटनेला एक महिना उलटून गेला असतानाच लंडनमध्येही अहमदाबादसारखा अपघात झाला. लंडन साउथेंड विमानतळावरून काही तासांपुर्वी उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच वेळातच एक विमान कोसळले, आणि पाहता पाहता ते एक मोठा आगीचा गोळा बनले.

London plane crash

विमानाची राख रांगोळी..

या विमान अपघातात अद्याप किती लोक मृत वा जखमी झाले हे समजू शकलेले नाही तरीही लंडनचे स्थानिक यंत्रणा याकामासाठी लागली आहे. विमानाची अक्षरशः राखरांगोळी झाली असून आकाशातही मोठा काळा धुर पसरला. या अपघाताचा व्हिडिओ एका जाहिरात एजन्सीच्या संचालक, आणि फॅक्टचेक प्रतिनिधी, उद्योजक रुला इल हलाबी यांनी एक्सवर अपलोड केला आहे. त्यात त्यांनी काही मजकूरही लिहिलेला आहे.

दरम्यान, यासंदर्भात या फ्लाइटराडारच्या म्हणण्यानुसार, बीच. बी. 200, सुपर किंग एअर या नावाने हे विमान ओळखले जाते.या विमानाने रविवारी दुपारी 3:48 वाजता उड्डाण केले होते आणि ते नेदरलँड्सच्या लेलिस्टॅडला जात होते.

कसा घडला अपघात?

मिडिया रिपोर्टनुसार, उड्डाणानंतर काही सेकंदातच हे विमान डावीकडे वळले, उलटले आणि जमिनीवर कोसळले. पाहता पाहता हे विमानाचा आगीचा गोळाच बनला आणि आकाशात मोठा धुराळा झाला. दरम्यान, आपत्कालीन सेवांनी तातडीने मदत केली आणि घटनास्थळीच कार्य करत आहेत. अपघातात किती जण जखमी झाले किंवा किती जण जखमी झाले याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, क्रॅश झालेले विमान बीच बी२०० सुपर किंग एअर असल्याचे सांगितले जात असून अधिकाऱ्यांनी अद्याप या विमानाच्या दुर्घटनेची स्पष्टता दिलेली नाही.

व्हिडिओ व्हायरल..

ऑनलाइन शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये विमानतळावरील अपघातस्थळावरून मोठ्या ज्वाला आणि दाट काळा धूर निघत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओंमध्ये गोल्फ कोर्सचे फुटेज देखील दाखवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+