हिजबुल्लाहमध्ये पेजर कसे फुटले? एकाच वेळी सर्वत्र स्फोट कसे झाले?; जाणून घ्या- पेजरबद्दल सविस्तर
Lebanon Pager Serial Blasts Explained : लेबनॉनच्या अनेक शहरांमध्ये 18 सप्टेंबर रोजी लोकांच्या खिशात आणि हातात असलेले पेजर अचानक घरे, रस्त्यावर आणि बाजारात फुटू लागले. लेबनॉन ते सीरियापर्यंत सुमारे तासभर स्फोटांचा क्रम सुरू होता. या बॉम्बस्फोटात अनेकांचा जीव गेला तसेच तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले.
लेबनानमध्ये झालेल्या स्फोटाने संपूर्ण जगाची झोप उडाली केवळ हाताच्या तळहाताएवढ्या डिव्हाईसमध्ये, एकाच वेळी हजारो ठिकाणी स्फोट घडविण्यात आले. कुणाच्या खिशात, कुणाच्या हातात, तर कुणाच्या पर्समध्ये स्फोट होऊन तब्बल 11 हून अधिक लोक मृत्यू पावले. शिवाय, एकाचवेळी झालेल्या या हल्ल्यात दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याच्या बातम्याही आल्या. या स्फोटांमुळे खळबळ उडाली.
हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात वाद आहे. हिजबुल्लातील कम्युनिकेशन नेटवर्क इस्रायलन हॅक केलं किंवा त्या पेजरमध्येच स्फोटकं प्लान्ट केली, हे आता येत्या काही तासांत समजेलच. मात्र एकाचवेळी हे स्फोट झाल्याने सेफ समजल्या जाणाऱ्या पेजरसारख्या उपकरणांवरही आता शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

पेजर म्हणजे काय? ते कसं चालतं?
पेजर म्हणजे एक लहानसं टेलिकम्युनिकेशन डिव्हाईस आहे. पेजिंग नेटवर्कद्वारे ते रेडिओ सिग्नल रिसिव्ह करतं. पेजर हे वन-वे आणि टू-वे अशा दोन प्रकारचे असतात. वन-वे म्हणजे ज्यात मेसेज केवळ मिळवता येतो आणि टू-वे पेजरमध्ये रिप्लायदेखील करता येतो. पेजरद्वारे पाठवलेला मेसेज एका सिग्नलमध्ये एन्कोड होतो. एन्कोड केलेले सिग्नल सेंट्रल ट्रान्समीटरद्वारे पेजिंग नेटवर्कला पाठवले जातात. हे सिग्नल रेडिओ फ्रीक्वेंन्सीद्वारे ब्रॉडकास्ट होतात. दुसरा पेजर आपल्या एँटिनाच्या माध्यमातून तो सिग्नल मिळवतो. हे सर्व एका खास फ्रीक्वेंन्सीवर सेट होतं, जे पेजिंग नेटवर्कचा वापर करत असतं. याच नेटवर्कद्वारे मेसेजद्वारे संवाद साधता येतो.
एकाच वेळी इतके ब्लास्ट कसे झाले?
हिजबुल्ला दहशतवादी साथीदारांशी संवाद साधण्यासाठी मोबाईलऐवजी पेजर वापरत होते. 1996 मध्ये एका अतिरेक्याच्या मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर या अतिरेक्यांनी मोबाईल वापरण सोडून दिलं होतं. शिवाय मोबाईल फोन हॅक करणं सोपं ठरतं, मात्र पेजर हॅक केलं जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे हिजबुल्लाच्या सर्व अतिरेक्यांनी पेजर वापरणं सुरु केलंय. पण मंगळवारी अचानक या दहशतवाद्यांच्या खिशातल्या पेजरचे स्फोट झाले. यात हजारो जखमी तर कित्येकांचा मृत्यूही झाला. ज्या पेजरमध्ये स्फोट झाले ते सर्व पेजर नवीनच खरेदी केल्याचे वृत्तही काहीं वाहिन्यांनी दिले. आता हे स्फोट एकाचवेळी कसे केले गेले, हे अद्याप समजलेलं नाही. पण काहींच्या मते इस्त्रायलने ते बनविणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्यात स्फोटकं प्लान्ट केले होते. तर काहींच्या मते, पेजरचे सिन्गल हॅक करुन हे स्फोट केले गेले असावेत.
दोन्ही देशांतला संघर्ष वाढण्याची शक्यता
इस्रायलचा आणि हिजबुल्लाहमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष आहे. हिजबुल्लाहने इस्रायलविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून लढायाही सुरु केल्या आहेत. इस्रायलच्या सुरक्षा समितीने त्यांच्या नागरिकांना देशाच्या उत्तर भागात सुरक्षितपणे हलवण्याचा निर्णय घेतल्याच्या काही तासांमध्येच हे हल्ले झाले. या दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी, दोन्ही देशांनी थोडी मर्यादा ठेवली आहे. एकमेकांविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलेले नाही. पण मंगळवारच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची धमकी दिल्यानंतर आता मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications