खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्लाला कॅनडा पोलिसांनी घेतले ताब्यात; तो हरदीपसिंग निज्जरचा साथीदार!
Khalistani terrorist Arshdeep Dalla Arrested : खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्ला याला कॅनडामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्शदीप हा हरदीप सिंग निज्जरचा जवळचा व्यक्ती मानला जातो. विशेष बाब म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी कॅनडातील मिल्टन शहरात गोळीबार झाला होता. 29 ऑक्टोबर रोजी तेथील स्थानिक पोलिसांनी दोन लोकांना अटक केली होती. त्यात अर्शदीपचा देखील समावेश होता. परंतु पोलिसांनी तेव्हा ओळख जाहीर केली नव्हती.
दरम्यान, रविवारी सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यातील एक आरोपी अर्शदीप डल्ला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सोडण्यात आले की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. डल्लाच्या कोठडीबाबत कॅनेडियन पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कॅनडा आणि भारत यांच्यातील राजनैतिक चर्चा सध्या ठप्प झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण घेणे तसे अवघड झालेले आहे.

भारताने दोन वर्षांपूर्वी केले होते दहशतवादी घोषित
2022 मध्ये, गँगस्टर आणि खलिस्तान टायगर फोर्सऑपरेटिव्ह अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्शदीप डल्ला याला केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते. पंजाबमधील मोगा येथून कॅनडात लपून बसलेल्या अर्शवर खून, खंडणी आणि देश-विदेशातील जघन्य गुन्ह्यांसह दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे.एनआयए त्याला खून, दहशतीसाठी निधी उभारणे, हत्येचा प्रयत्न, सांप्रदायिक मुद्द्यांना प्रोत्साहन देणे आणि पंजाबमधील लोकांमध्ये दहशत निर्माण करणे या प्रकरणात दोषी ठरवून दहशतवादी घोषित केले होते.
अर्शदीप हा हरदीप निज्जरचा जवळचा आहे
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अर्शदीप UAPA अंतर्गत वाँटेड दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या अगदी जवळ आहे. त्याच्या वतीने दहशतवादी मॉड्यूल चालवतो. दहशतवादी कारवाया, खून, खंडणी याशिवाय तो मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीशी संबंधित आहे.
भारत- कॅनडातून अधिकारी माघारी फिरले
कॅनडासोबतच्या संबंधांमध्ये तणाव असताना, भारताने 14 ऑक्टोबर रोजी प्रभारी उच्चायुक्त स्टीवर्ट रॉस व्हीलरसह कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली. तत्पूर्वी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडातील आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनाही परत बोलावले होते. ट्रूडो सरकारच्या एका पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय उच्चायुक्त आणि इतर काही मुत्सद्दींना कॅनेडियन नागरिकाच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून वर्णन करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications