मोठी बातमी ! कपिल शर्माच्या कॅफेवर कॅनडात गोळीबार; थरारक व्हिडिओ समोर

कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या नव्याने सुरू झालेल्या कॅनडामधील रेस्टॉरंटवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असून, या घटनेची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या खलिस्तानी संघटनेशी संबंधित हरजीत सिंग लड्डी या वॉन्टेड दहशतवाद्याने स्वीकारली आहे.

kapil sharma canada cafe

कॅनडाच्या सरे शहरात 'कॅप्स कॅफे' वर गोळीबार

कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच आपल्या पत्नी गिन्नी चतरथसोबत कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे (Surrey) शहरात 'कॅप्स कॅफे' नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांची उपस्थिती होती आणि सोशल मीडियावर कॅफेच्या उद्घाटनाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

घटनेच्या रात्रीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक कार कॅफेजवळ थांबते आणि त्यातून एक व्यक्ती बाहेर न येता, कारमधूनच कॅफेच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये अंदाजे 9 गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दहशतवाद्याची जबाबदारीची कबुली

हरजीत सिंग लड्डी, जो पंजाबमधील नवांशहरचा रहिवासी आहे आणि सध्या NIA च्या सर्वाधिक शोधात असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे, त्याने या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात येते. लड्डीने कपिल शर्माने यापूर्वी केलेल्या काही विधानांचा संदर्भ देत, या हल्ल्यामागे हेतुपूर्वक उद्देश असल्याचे सांगितले आहे.

NIA कडून आरोपपत्र दाखल

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने हरजीत सिंग लड्डी याच्याविरोधात 2023 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. याचप्रमाणे, पाकिस्तानस्थित BKI प्रमुख वधवा सिंग आणि इतर चार संशयितांविरोधातही आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या कारवाईचा संदर्भ पंजाबमधील हिंदू नेते, विशेषतः विश्व हिंदू परिषदेचे नेता विकास प्रभाकर ऊर्फ विकास बग्गा यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित होता.

प्रकरणाची चौकशी सुरू

कॅनडातील स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि भारतातील एजन्सी या घटनेचा सखोल तपास करत आहेत. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा परदेशातील भारतीय व्यावसायिक आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+