Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नको तेच घडलं! इराणचा होर्मुज समुद्रधुनीमध्ये मिसाईल हल्ला! 10 तेलवाहू जहाजे भस्मसात; इंधनाला फटका

Iran missile attack strait of hormuz oil tankers us iran war : "मध्य-पूर्वमध्ये महायुद्धाचा भडका उडाला असून इराणने होर्मुजची समुद्रधुनी अक्षरशः 'स्मशान' बनवली आहे! युद्धाच्या सहाव्या दिवशी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने १० हून अधिक तेलवाहू टँकर्सवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून त्यांना जलसमाधी दिली आहे.

इराणच्या विध्वंसक कारवाईमुळे जगाचा २० टक्के तेल आणि गॅस पुरवठा ठप्प झाला असून, दुसरीकडे अमेरिकेने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणची युद्धनौका टॉरपीडोने उडवून सडेतोड उत्तर दिले आहे. रक्ताळलेल्या समद्रात सुरू असलेल्या या संघर्षाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया हादरवला आहे..."

Iran missile attack strait of hormuz oil tankers us iran war

होर्मुज समुद्रधुनी बनली 'किलिंग झोन'

इराणच्या IRGC नौदलाचे उपकमांडर मोहम्मद अकबरझादेह यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १० पेक्षा जास्त तेल टँकर्सना मिसाइलने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे जहाजांना भीषण आग लागली असून इराणने आता या मार्गावरून जाणाऱ्या सर्व जहाजांवर पूर्णतः बंदी घातली आहे. परिणामी, कतार, इराक आणि सौदी अरबचा तेल पुरवठा अडकला आहे.

हिंद महासागरात अमेरिकेचा भीषण प्रहार

युद्धाची व्याप्ती आता खाड़ी देशांपलीकडे हिंद महासागरापर्यंत पोहोचली आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ कारवाई

अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेतील गाले (Galle) तटापासून ४० सागरी मैलावर इराणची आधुनिक युद्धनौका 'IRIS Dena' टॉरपीडोने उडवून दिली.

ऐतिहासिक घटना

दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या शत्रूचे जहाज टॉरपीडोने बुडवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. यात इराणचे ८० नौसैनिक मारले गेले आहेत.

भारत आणि महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

१. पेट्रोल-डिझेल टंचाई

भारताच्या 'मॅंगलोर रिफायनरी' आणि 'पेट्रोनेट एलएनजी' ने धोक्याची नोटीस (Force Majeure) जारी केली आहे.

२. महाराष्ट्रात पंपावर लांबवर रांगा

पेट्रोल संपण्याच्या भीतीने महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

३. कच्च्या तेलाचे दर

युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत १२% वाढ झाली असून, दर प्रति बॅरल ७६ डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, अमेरिका खाडीतील तेलवाहू जहाजांना लष्करी संरक्षण आणि विमा कवच पुरवेल. मात्र, सध्याची भीषण गोळीबारी पाहता हे संरक्षण देणे आव्हानात्मक ठरणार आहे.

हेही वाचा : इराण-इस्त्रायल युद्धाच्या भडक्याने शेअर बाजार कोसळला!; रुपया 92 च्या पार, गुंतवणूकदारांना मोठा फटका

हेही वाचा : इराण-इस्रायल युद्धाचा भडका! पेट्रोल-डीझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार मोठी वाढ? काय आहेत अंदाज

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+