इराण-इस्रायल युद्धाचा भडका! पेट्रोल-डीझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार मोठी वाढ? काय आहेत अंदाज
Petrol diesel lpg price update iran israel war impact india : मध्य पूर्वेतील इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत ९ ते १३ टक्क्यांची वाढ झाली असून, नैसर्गिक वायूच्या (LNG) किमतीत ५० टक्क्यांनी उसळली आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० ते ८८% कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे या युद्धाचा फटका सामान्यांच्या खिशाला बसण्याची दाट शक्यता आहे.

व्यावसायिक गॅस महागला, घरगुती ग्राहकांना दिलासा
आज ३ मार्च २०२६ रोजी एलपीजी सिलिंडरचे दर
- घरगुती सिलिंडर (१४.२ किलो): दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत हा दर ८५३ रुपयांवर स्थिर आहे.
- कमर्शियल सिलिंडर (१९ किलो): हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी वाईट बातमी आहे. १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरमध्ये २८ ते ३१ रुपयांची वाढ झाली आहे.
- मुंबई: २८.५० रुपयांच्या वाढीसह आता १,७२०.५० रुपयांना सिलिंडर मिळेल.
- दिल्ली: २८ रुपयांच्या वाढीसह १,७६८.५० रुपये.
पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ८० डॉलरवर पोहोचले असले, तरी भारतात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती स्थिर आहेत. रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच सरकार 'बफर स्टॉक'चा वापर करून किमती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कच्चे तेल १०० डॉलरच्या पार गेल्यास किमती वाढवणे अनिवार्य होईल.
युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम
- रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९१.४९ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
- शेअर बाजारात 'ब्लड बाथ': गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून एकाच दिवसात सुमारे ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती स्वाहा झाली आहे.
- महागाईचे संकट: इंधन महागल्यास मालवाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळे डाळ, तांदूळ आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
(डिस्क्लेमर: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आकडेवारीवर आधारित आहे. तेल कंपन्यांच्या निर्णयानुसार दर बदलू शकतात.)
हेही वाचा : Iran israel war impact : इराण-इस्रायल युद्धाचा 'भारताच्या 'या' 5 गोष्टींवर परिणाम, महागाईचे संकट
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications