Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'आम्हाला धमकी देऊ नका', इराण-इस्रायल तणाव वाढला: इस्रायलची अली खमेनींना संपविण्याची धमकी!

Israel threatens to kill Ayatollah Ali Khamenei : इस्रायलने पुन्हा एकदा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांना थेट टारगेट करण्याची धमकी दिली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी रविवारी रॅमन हवाई तळावर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत हे विधान केले.

"जर इराणकडून आमच्या देशाला धोका निर्माण झाला, तर खमेनी सुरक्षित राहणार नाहीत, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू," असा इशारा काट्झ यांनी दिला. यावेळी आम्ही त्यांना सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याविधानावरुन दोन्ही देशांत अजूनही तणावाची स्थिती कायम असल्याचे स्पष्ट होते.

Iran-Israel war

मागील युद्धातील अनुभव आणि खमेनींची सुरक्षा

गेल्या महिन्यात, जून 2025 मध्ये, इस्रायल आणि इराणमध्ये तब्बल 12 दिवसांचे भीषण युद्ध झाले होते. या काळात, इस्रायलकडून खमेनींना लक्ष्य करण्याबद्दल सतत चर्चा सुरू होती. काही दाव्यानुसार, इस्रायली एजंट त्यांच्या अगदी जवळ पोहोचले होते. या धोक्यामुळे खमेनींना युद्धादरम्यान बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

"आम्हाला धमकावू नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील

संरक्षण मंत्री काट्झ यांनी खमेनींना थेट संदेश दिला आहे. ते म्हणाले की मी खमेनींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, जर तुम्ही इस्रायलला धमकावत राहिलात, तर आमचा हात पुन्हा एकदा इराणपर्यंत पोहोचेल.

यावेळी ते अधिक ताकदीने होईल आणि यावेळी आम्ही तुमच्यापर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचू. त्यामुळे आम्हाला धमकावू नका, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल.

काट्झ यांनी 'ऑपरेशन रायझिंग लायन' दरम्यान इस्रायली हवाई दलाच्या कामगिरीचे कौतुक केले. आम्ही इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करून धोके दूर केले.

आम्ही इराणला स्पष्ट संदेश दिला की, जर त्यांनी आमच्याशी गोंधळ घातला तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तेहरानमधील राजवटीने हे समजून घेतले पाहिजे," असेही ते म्हणाले.

इराणविरोधात काट्झची आक्रमक भूमिका

इस्रायल काट्झ यांची भूमिका इराण आणि खमेनींसाठी सातत्याने आक्रमक राहिली आहे. 17 जून रोजी त्यांनी खमेनींना हत्येची धमकी दिली होती आणि त्यांना इराकी हुकूमशहा सद्दाम हुसेनसारखेच नशिब भोगावे लागू शकते असे म्हटले होते. त्यानंतर, 10 जुलै रोजी एका समारंभात बोलताना काट्झ यांनी इराणमधील तेहरान ते इस्फहान आणि तब्रिझपर्यंत हल्ले करून इस्रायलने आपली ताकद दाखवली असल्याचे देखील नमूद केले.

काट्झ यांनी पुन्हा स्पष्ट केले की, जर इराणने ज्यू राष्ट्राच्या संयमाची परीक्षा घेतली, तर हवाई दलाच्या विध्वंसक शक्तीबद्दल अली खमेनी आणि इतर इराणी नेत्यांना हा थेट संदेश आहे. इस्रायलला हानी पोहोचवू इच्छिणाऱ्या इराणी अधिकाऱ्यांना लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+