भारतीय शेअर बाजारता उच्चांक येण्याची शक्यता, चीनला झटका, पहा काय झालंय...
CLSA India Investment : भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हैरान झाले होते. आत या गुंतवणुकदारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग येथील ब्रोकरेज फर्म CLSA ने भारतातील गुंतवणुकीसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात भारतातील गुंतवणूक 20 टक्क्यांनी वाढविण्याचे धोरण त्यांनी जाहीर केली. यापूर्वी सीएलएसएने चीनमध्ये भारतापेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे धोरण स्विकारले होते. पण आता या धोरणामुळे चीनला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चीनला बसणार धक्का
भारतातील शेअर मार्केटमध्ये गेल्या काही काळापासून घसरण सुरू होती. त्याऊलट चिनच्या शेअर बाजारात दिवसेंदिवस तेजी येत होती. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. चीनच्या खेळीमुळे विदेशी पाहुणे चीनकडे वळतील, असेही सांगितले जात होते. पण आता FII आणि CLSA यासारख्या मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या वाढत्या चिंतेचा हवाला देत भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

डोनाल्ड ट्रमचा पायगुण चांगला
अमोरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पायगूण भारतासाठी चांगला समजला जात आहे. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या बहुतेक निर्यातीवर 60% शुल्क लागू करण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तेथील अनेक ब्रोकरेज हे भारताकडे वळतील, अशा शक्यता आता व्यक्त होत आहेत. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या मदत पॅकेजमध्ये चीनसाठी कोणतीही मोठी मदत दिसत नाही. त्यामुळे अनेक ब्रोकरेज चीनऐवजी भारताला पसंती देतील, असेही बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications