Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकड्यांसह चीनची झोप उडणार! भारताला मिळणार रशियाची महाभयंकर S-350 Vityaz प्रणाली; जाणून घ्या!

Russia Offers S-350 Vityaz to India : भारताच्या हवाई सीमा आता अधिक अभेद्य होणार आहेत. रशियाने भारताला आपली अत्यंत प्रगत आणि विध्वंसक अशी S-350 Vityaz हवाई संरक्षण प्रणाली देण्याची ऑफर दिली आहे.

विशेष म्हणजे, रशियाने केवळ ही प्रणाली देण्याचेच नाही, तर तिचे तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

यामुळे भारताची 'एकात्मिक हवाई संरक्षण क्षमता' इतकी मजबूत होईल की, शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्रे भारताच्या हद्दीत शिरण्यापूर्वीच आकाशात भस्मसात होतील.

Russia Offers S-350 Vityaz to India

S-350 Vityaz : रशियाचे अमोघ अस्त्र

S-350 Vityaz ही मध्यम श्रेणीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. रशियाच्या जुन्या S-300 प्रणालीला अधिक आधुनिक आणि घातक बनवून ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.

अष्टपैलू मारक क्षमता : हे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि शत्रूची अत्यंत गुप्त अशी 'स्टेल्थ' लक्ष्ये शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे.

एकाच वेळी अनेक वार : या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, एकाच लाँचरवर १२ क्षेपणास्त्रे लोड केली जाऊ शकतात. यामुळे एकाच वेळी अनेक दिशांनी येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्यांचा ही यंत्रणा खात्मा करू शकते.

तांत्रिक क्षमता: का थरथर कापणार शत्रू?

S-350 विटाझ ही केवळ एक यंत्रणा नसून एक 'डेथ ट्रॅप' आहे.

पल्ला : वायुगतिकीय लक्ष्यांसाठी (विमाने इ.) १२० किमी आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी २५-३० किमीपर्यंत याचा अचूक मारा आहे.

उंची : ही यंत्रणा २० ते ३० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांनाही सहज टिपू शकते.

क्षेपणस्त्रे : ९M९६ई (9M96E), ९M९६ई२ आणि ९M१०० यांसारख्या आधुनिक क्षेपणास्त्रांनी ही यंत्रणा सज्ज आहे.

AESA रडार : यातील बहु-कार्यक्षम रडार अगदी कमी उंचीवर उडणाऱ्या धोक्यांनाही अचूकपणे शोधू शकते, जे शत्रूच्या क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी काळ ठरेल.

पाकिस्तान आणि चीनची झोप उडणार!

भारताच्या शेजारील दोन्ही शत्रू राष्ट्रांसाठी S-350 ही एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

पाकिस्तानला धक्का: पाकिस्तानची JF-17 आणि J-10 लढाऊ विमाने तसेच त्यांची 'बाबर' क्रूझ क्षेपणास्त्रे S-350 च्या कचाट्यातून वाचू शकणार नाहीत. यामुळे सीमेवर पाकिस्तानची आक्रमकता पूर्णपणे थंडावेल.

चीनचे स्टेल्थ विमाने हतबल: लडाख आणि अरुणाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात चीनच्या J-20 स्टेल्थ फायटर आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांविरुद्ध S-350 भारताला एक 'पोलादी भिंत' प्रदान करेल.

भारताची बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा

भारताकडे सध्या 'आकाश', 'बराक-८' आणि रशियाचीच जगात सर्वोत्तम मानली जाणारी 'S-400 ट्रायम्फ' ही यंत्रणा आहे. आता यामध्ये S-350 ची भर पडल्यास, भारताची हवाई सुरक्षा 'मल्टी-लेयर्ड' (बहुस्तरीय) होईल. अलीकडच्या उच्च-स्तरीय चर्चेत S-400 च्या अतिरिक्त तुकड्या आणि भविष्यातील S-500 प्रणालीवरही चर्चा झाली आहे.

'मेक इन इंडिया'ला मिळणार बळ

रशियाने या करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाचा (ToT) प्रस्ताव दिला आहे. याचा अर्थ असा की, या प्रणालीचे काही महत्त्वाचे घटक भारतातच तयार केले जातील. यामुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळेल आणि देखभालीसाठी रशियावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+