Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतात 'माॅक ड्रिल' पाकिस्तानात टेन्शन! 3 सेनाध्यक्षांसह पंतप्रधानांची बैठक, काय घडलं? वाचा

India Pakistan War Mock Drill in India Tension in Pak : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या 259 शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे.

युद्धजन्य स्थितीसंदर्भात देशात काय स्थिती असेल हल्ला झाल्यास आणि काय उपाय करता येईल यासाठी हे माॅक ड्रिल करण्यात येत आहे. भारतीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने एक बैठक घेत निवेदन जारी केले आहे.

India Pakistan War Mock Drill in India Tension in Pak

भारतात 7 मे रोजी होणाऱ्या माॅक ड्रिलच्या एक दिवस आधी म्हणजेच 6 मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीत संभाव्य युद्धाचे धोके, पारंपारिक धोके आणि या आव्हानांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानची तयारी काय याचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा : Pahalgam Attack : पाकची डिजिटल घुसखोरी! एक दोन नव्हे अनेक भारतीय संस्था सायबर हल्ल्याच्या जाळ्यात

आजतकने स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानुसार, यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, उपपंतप्रधान इशाक डार, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आणि तिन्ही सेनादलाचे प्रमुख पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा : 'मोदी सरकार हैं..चुन चुन के मारेंगे', पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमित शहांनी दिला पाकला इशारा

काय झाले या बैठकीत?

पुर्व सीमेवर भारताची आक्रमक हालचाली पाहता पारंपारिक सैन्यांचा धोक्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच बदलत्या संभाव्य धोक्याचे स्वरुप, पारंपारिक सैन्यांचा पर्याय, रणनिती आणि दहशतवादी नेटवर्कसंबंधी माहिती पंतप्रधान शहबाज शरीफ यांना देण्यात आली. आयएसआयचे महासंचालक आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल मुहम्मद आसिम मलिक आणि सेनादलाचे माध्यम प्रवक्ता लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीही या बैठकी दिसले.

पाकच्या बैठकीत काय ठरलं?

  • पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या बैठकीत पाकिस्तान कोणत्याही संकटाशी लढण्यास तयार आहे हे सांगण्यात आले.
  • राष्ट्रीय एकता आणि सर्व संस्थांची मदत आणि जनतेच्या विश्वासासह पाकिस्तानी सशस्त्र सेना देशाच्या सुरक्षा, सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी प्रत्येक गोष्टींसाठी बांधिल आहे असेही सांगण्यात आले.
  • पाकिस्तानमधील वेगवेगळ्या एजन्सीमध्ये समन्वय ठेवावा. संचालन क्षमता अधिक मजबूत करा आदी सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+