कॉमर्सपासून क्रिएटिव्हिटीकडे : पीयूष गोयल, जोनाथन रेनॉल्ड्स आणि ए. आर. रहमान IGF लंडन 2025 चे आकर्षण

युनायटेड किंगडममध्ये होणाऱ्या इंडिया ग्लोबल फोरमच्या (IGF) प्रमुख कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरणार आहे IGF लंडन 2025, जे भारताचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार व व्यवसाय सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यातील ऐतिहासिक संयुक्त चर्चेने सुरू होणार आहे.

IGF London 2025

हे दोन्ही मंत्री यावेळी प्रथमच एका सार्वजनिक सत्रात एकत्र येणार असून नुकत्याच अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) नंतरचा हा पहिलाच सार्वजनिक संवाद ठरणार आहे.

18 ते 20 जून 2025 दरम्यान होणाऱ्या IGF लंडनमध्ये, या मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या पुढील टप्प्यांविषयी चर्चा होणार असून, त्यातून या भागीदारीतून उभ्या राहू शकणाऱ्या व्यापक आर्थिक संधींचा आढावा घेतला जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचे जागतिक प्रमाण निश्चित होण्याची शक्यता आहे.

इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवा म्हणतात, "भारत-ब्रिटन संबंध आता केवळ हेतूवर नव्हे, तर जलद अंमलबजावणीवर आधारित नव्या युगात प्रवेश करत आहेत. मुक्त व्यापार करार हे एक निमित्त आहे, परंतु या भागीदारीची खरी ताकद लोकांमध्ये, कल्पनांमध्ये आणि संस्थांमध्ये आहे. IGF मध्ये आम्ही या सामायिक महत्त्वाकांक्षेला दीर्घकालीन परिणामांमध्ये बदलवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. तेही वाणिज्य, संस्कृती, नवोपक्रम आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांत."

या वर्षीच्या IGF लंडनमध्ये UK-India आर्थिक संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. या कार्यक्रमात ग्रँट थॉर्नटनचा "India Meets Britain Tracker" लाँच केला जाणार आहे. इंडिया ग्लोबल फोरम आणि CII च्या सहकार्याने सादर होणारा हा अहवाल, ब्रिटनमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारतीय व्यवसायांची माहिती देतो आणि FTA नंतरच्या आर्थिक संधी, गुंतवणुकीचे ट्रेंड आणि भविष्याची दिशा यांवर अंतर्दृष्टी देतो.

साहित्य क्षेत्रात, यावेळी IGF आर्चर-अमिश पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. हा पुरस्कार आधुनिक भारतातील गुंतागुंतीचे, पण प्रेरणादायी वास्तव उलगडणाऱ्या काल्पनिक कादंबऱ्यांना दिला जातो. ज्योफ्री आर्चर आणि अमिश त्रिपाठी यांच्या सहकार्याने स्थापन झालेला हा पुरस्कार आज जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पुरस्कार समारंभ QEII सेंटर येथे होणार आहे.

दुसऱ्या दिवशी विज्ञान व तंत्रज्ञानावर केंद्रित सत्रात, ब्रिटनचे विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम मंत्री लॉर्ड पॅट्रिक वॅलन्स यांचे की-नोट भाषण होईल. भारत व ब्रिटनमधील शास्त्रज्ञ व संशोधकांसोबत झालेल्या संवादात, महामारीसाठीची तयारी, क्वांटम टेक्नॉलॉजी, ऊर्जा संक्रमण, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीवर चर्चा होईल. जिथे भारताची नवोन्मेषशक्ती आणि ब्रिटनचे संशोधन एकत्र येते.

सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेवरील विशेष सत्र 'Culture & Creativity Forum' तिसऱ्या दिवशी परत येणार आहे, ज्यामध्ये मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. या सत्रात भारत आणि ब्रिटनमधील कलाकार, कथा सांगणारे आणि सांस्कृतिक नेते भाग घेणार असून, प्रभाव, उद्दिष्ट आणि सहकार्य या गोष्टींना नव्याने अर्थ देण्याचा प्रयत्न केला जाईल.

वैश्विक नेतृत्वामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन देणारे एक खास सत्र सुद्धा यावेळी आयोजित केले गेले आहे, ज्यात गौरांग दास - आध्यात्मिक नेते आणि शाश्वततेचे विचारवंत सहभागी होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानप्रधान जगात भारतीय तत्वज्ञान, नेतृत्वगुण, उत्पादकता आणि आयुष्याचा हेतू कसा घडवतो यावर चर्चा होईल.

कार्यक्रमाची सांगता होणार आहे ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी होणाऱ्या एका विशेष संवाद सत्राने. संगीत, तंत्रज्ञान आणि परंपरेच्या संगमावर आधारित ही चर्चा, संगीताचे भविष्य, ध्वनीतील नवकल्पना आणि वैचारिक परिवर्तन यांवर प्रकाश टाकेल.

IGF लंडन 2025 ही केवळ एक परिषद नसून, भारत आणि ब्रिटनमधील नातेसंबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे - जिथे व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती आणि विचार यांचे मिलन घडते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+