मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 51 जणांचा मृत्यू: 27 मुली बेपत्ता; या देशात पावसामुळे मृत्यूचा तांडव!
Heavy rains in Texas USA : सर्व काही वातावरण ठीक ठाक होते, परंतु, अचानक पर्यावरणात बदल झाला अन् काही क्षणातच पाऊस सुरू झाला. हा पाऊस अतिशय वेगाने होता की, काही मिनिटांमध्ये या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले.
तर अवघ्या काही तासांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी होऊन लाखो लोकांच्या घरात ते घुसले. या सर्व घटनेमध्ये सुमारे 51 लोक ठार झाले आहेत. तर 27 तरुणी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता आहे. हा सर्व प्रसंग घडलाय तो अमेरिकेतील टेक्सास या शहरात.
27 मुली कॅम्पमधून बेपत्ता!
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी मुसळधार पावसानंतर ग्वाडालुप नदीत अचानक आलेल्या पुरामुळे 51 जणांचा मृत्यू झाला.
नदीजवळ मुलींसाठी उन्हाळी शिबिर होते, जे अचानक आलेल्या पुरात अडकले. कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या 750 मुलींना वाचवण्यात आले. तर सुमारे 27 मुली बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, टेक्सासमधील सॅन अँटोनियोमध्ये सुमारे 15 इंच (38 सेमी) पाऊस पडला. अवघ्या 45 मिनिटांत नदीची पातळी 26 फूट म्हणजे 8 मीटर वाढली, ज्यामुळे घरांमध्ये पाणी घुसले तसेच अनेक वाहने वाहून गेली.
पुराचा धोका अजूनही कायम!
टेक्सासचे गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी देखील माहिती दिली की, पुराचा धोका अजूनही कायम आहे. बचाव पथके काम करत आहेत. ज्यामध्ये नऊ बचाव पथके, 14 हेलिकॉप्टर आणि 12 ड्रोनचा समावेश आहे. आतापर्यंत 850 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.
मोदींनी व्यक्त केल्या संवेदना!
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट करून टेक्सासमधील विनाशकारी पुरामुळे मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी बाधित कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला.
लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला!
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी पूर परिस्थिती लक्षात घेता आपत्कालीन इशारा कायम ठेवला आहे. ग्रेग अॅबॉट म्हणाल, बेपत्ता लोकांच्या शोधात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हे ऑपरेशन 24 तास सतत सुरू राहील. शेवटच्या माणसांपर्यंत शोध सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुसरीकडे, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे मुसळधार पावसात 1,000 हून अधिक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. अचानक आलेल्या पुराचा इशारा अजूनही कायम आहे.












Click it and Unblock the Notifications