कट्ट्रर हिंदू नेत्याची हत्या, ISI शी संबंध; कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ला करणारा हरजीत सिंग लड्डी कोण?

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या नव्याने सुरू झालेल्या कॅनडामधील रेस्टॉरंटवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हा गोळीबार 9 जुलैच्या रात्री ब्रिटिश कोलंबियातील सरे शहरात स्थित KAP's Cafe वर करण्यात आला. रिपोर्टनुसार, हल्लेखोरांनी कॅफेवर तब्बल 9 फायर केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

harjit singh laddi


या हल्ल्याची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या हरजीत सिंग लड्डी नावाच्या सदस्याने घेतली आहे. पण हरजीत सिंग लड्डी नक्की आहे तरी कोण? आणि त्याने कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार का केला? याचा सविस्तर तपशील खाली वाचा.

कोण आहे हरजीत सिंग लड्डी?

हरजीत सिंग लड्डी हा पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील रहिवासी असून तो बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. सुरक्षा यंत्रणांनुसार तो सध्या जर्मनीमध्ये वास्तव्यास आहे. भारत सरकारने त्याला 'मोस्ट वॉन्टेड दहशतवादी' घोषित केले आहे आणि त्याच्यावर ₹10 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे.

त्याच्यावर पंजाबमध्ये अनेक दहशतवादी हल्ले, हथियारांची तस्करी आणि आर्थिक पुरवठा (फंडिंग) करण्याचे गंभीर आरोप आहेत.

ISI सोबत संबंध

हरजीत लड्डीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI सोबतही संबंध असल्याचे उघड झाले आहे. तो पाकिस्तानातील BKI प्रमुख वधवा सिंग बब्बर याच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून त्याच्यावर संघटनेच्या ग्लोबल ऑपरेशन्स आणि आंतरराष्ट्रीय फंडिंगची जबाबदारी आहे. तो जर्मनीमध्ये बसून कॅनडामधील अनेक कारवायांमध्ये सक्रिय आहे.

VHP नेत्याची हत्या घडवली

कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या फायरिंगपूर्वी हरजीत लड्डीचं नाव विश्व हिंदू परिषद (VHP) नेते विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या हत्येशी जोडले गेले होते. NIAने दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, 13 एप्रिल 2024 रोजी रूपनगर, पंजाबमध्ये ही हत्या करण्यात आली होती. वधवा सिंग बब्बर आणि हरजीत लड्डी यांनी ही हत्या घडवून आणल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कपिल शर्मावर राग का?

हरजीत सिंग लड्डी कपिल शर्मावर त्यांच्या जुन्या कॉमेडी शोमधील एका विधानामुळे नाराज होता. त्याच्या मते, कपिल शर्माने शोमध्ये निहंग शीख समुदायावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. या विधानाचा "बदला" घेण्यासाठीच त्याने कपिलच्या नव्या कॅफेवर हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्याने X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर केला आहे.

निहंग शीख हे एक शौर्यशील योद्धा संप्रदाय आहे, जे निळ्या पोशाखात, हथियारांनी सज्ज असतात आणि शिख धर्मातील एक विशिष्ट पंथ म्हणून त्यांची ओळख आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनल म्हणजे काय?

  • बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या संघटनेची स्थापना 1978 साली खालिस्तानची मागणी पुढे ठेवून करण्यात आली होती. 1980 आणि 1990 च्या दशकात, या संघटनेने कित्येक मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले.
  • 23 जून 1985 रोजी बब्बर खालसाने एअर इंडिया फ्लाइट 'कनिष्क' मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यात 329 जणांचा मृत्यू झाला होता.
  • याच संघटनेने पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचीही निर्घृण हत्या केली होती.

भारतासाठी धोका

बब्बर खालसासारख्या खालिस्तानी संघटना अजूनही भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहेत. आता ते परदेशातून (कॅनडा, जर्मनी) या देशांतून भारतविरोधी कारवाया करत आहेत, ज्यामुळं सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेला हा हल्ला याचाच ताजा पुरावा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+