हमास इस्त्रायल संघर्षाला 1 वर्ष पूर्ण, इराणनेही घेतला इस्त्रायलशी पंगा! हा संघर्ष कशामुळे? वाचा
Hamas Israel War : आज 7 ऑक्टोबर आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर ड्रोन हल्ला केला होता. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं. त्याच्या काही दिवसांआधीच इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्रं डागली आणि इस्रायलला आव्हान दिलं. एक वर्ष या संघर्षला झालं. मध्यपूर्वेमधल्या या संघर्षाबद्दल 'वन इंडिया मराठी' ने ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत दिवाकर देशपांडे यांनी या संघर्षाचं नेमकं विश्लेषण केलं आहे. या मुलाखतीद्वारे या संघर्षाचीच कथा आपण जाणून घेणार आहोत.
इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे नेते इस्माइल हानिये, हिजबुल्लाचे नेते हसन नसरल्लाहल यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण हा हल्ला केला, असं इराणने म्हटलं आहे. इस्रायल आता या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यातच इस्रायलने लेबनानवर हल्ला करून हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केलं आहे.

इस्रायल आणि इराण यांच्या सत्तास्पर्धेत गाझा आणि लेबनानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. यात हमास, हिजबुल्ला आणि हुती या दहशतवादी संघटनांचाही हैदोस सुरू आहे. या संघर्षात सामान्य माणसांचा बळी जातो, महिला आणि मुलांवरचे अत्याचार थांबत नाहीत आणि त्याचे परिणाम जगावर होत आहेत हे दिवाकर देशपांडे यांनी लक्षात आणून दिलं. मध्यपूर्व म्हणजे पश्चिम आशियामधल्या या संघर्षात इराण केंद्रस्थानी आहे, असं ते म्हणाले.
इस्रायल-पॅलेस्टाइन हा संघर्ष काय आहे?
हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला इस्रायल देशाची निर्मिती आणि पॅलेस्टिनी नागरिकांची मागणी समजून घ्यावी लागेल, असं दिवाकर देशपांडे यांनी सांगितलं. इस्रायल, पॅलेस्टाइन आणि जेरुसलेम हा नकाशा पाहिला तर हा तिढा आपल्या लक्षात येईल. मूळ पॅलेस्टाइन देशातून वेगळा देश कोरून काढून ब्रिटिशांनी 1948 साली ज्यू लोकांसाठी इस्रायलची निर्मिती केली. त्यावेळी पॅलेस्टाइनमधले काही लोक गाझा पट्टीकडे ढकलले गेले आणि काही लोक वेस्ट बँककडे ढकलले गेले.
या सगळ्यामध्ये जेरुसलेमही महत्त्वाचं आहे.
जेरुसलेममध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम या तिन्ही धर्मांची प्रार्थनास्थळं आहेत. त्यामुळे जेरुसलेम सगळ्यांनाच हवं आहे. जेरुसलेमचा ताबा मिळवण्यासाठीही इथे सतत संघर्ष उफाळून येत असतो. हमासने गाझा पट्टीतून हे हल्ले केले. त्यानंतर आजपर्यंत मध्यपूर्वेमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला आहे. हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले. या हिंसाचारात आतापर्यंत हजारे लोकांचा बळी गेला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू गाझा वरचे हल्ले थांबवायला तयार नाहीत. हमासच्या हल्ल्याचं निमित्त करुन नेतान्याहू यांनी गाझा वर हल्ला चढवला. त्यांना गाझामध्ये वंशसंहार करून ही संपूर्ण पट्टी रिकामी करायची आहे आणि गाझा वर कायमचा ताबा मिळवायचा आहे, असं दिवाकर देशपांडे यांनी सांगितलं.
पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल ही दोन मोठी सत्ताकेंद्रं आहेत. इराणचा इस्रायलच्या अस्तित्वालाच विरोध आहे आणि त्यामुळे इस्रायलचं इराणशी शत्रुत्व आहे. हिजबुल्ला, हमास आणि हुती या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इराण इस्रायलला लक्ष्य करत असतो.
इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद आणि इस्रायलचं लष्कर हेही याला जोरदार प्रत्युत्तर देत असतात. हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना लेबनानमधून हल्ले चढवते. हुती ही दहशतवादी संघटना येमेनची आहे आणि हमास ही पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची संघटना आहे.
रशिया - युक्रेन युद्ध
पश्चिम आशियामध्ये हा संघर्ष सुरू असताना रशिया आणि युक्रेन यांच्यातही युद्ध सुरूच आहे. रशिया आणि अमेरिका या महासत्तांचा विचार केला तर अमेरिका इस्रायलच्या बाजूने आहे आणि रशिया इराणच्या बाजूने आहे. रशिया आत्ता युक्रेन युद्धात गुंतलेला असल्याने याच काळात इराणचा काटा काढावा, असा इस्रायलचा इरादा दिसतो, असं दिवाकर देशपांडे म्हणाले.
अमेरिकेची भूमिका काय ?
मध्यपूर्वेमधल्या या संघर्षाबद्दल अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीत ट्रम्प निवडून आले तर ते बेंजामिन न्येतानाहू यांच्या बाजूने म्हणजे इस्रायलच्या बाजूने ठोस भूमिका घेऊ शकतात. पण कमला हॅरिस यांनी मात्र न्येतान्याहू यांना गाझा मधला हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे.
तेलाच्या किंमती वाढणार?
मध्यपूर्वेतल्या संघर्षामधले हे देश तेल उत्पादक देश आहेत. त्यामुळे या संघर्षाचा परिणाम तेलाच्या बाजारपेठेवर होतो आहे. तेलाच्या किंमती वाढल्या तर जगभरातच महागाई वाढणार आहे. त्यामुळे हा संघर्ष निवळावा आणि ड्रोन, क्षेपणास्त्रे यांचे हल्ले थांबावेत यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण जोपर्यंत इस्रायल पॅलेस्टाइन संघर्षावर कायमचा तोडगा निघत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार, असं दिवाकर देशपांडे म्हणाले.
हिजबुल्ला, हमास आणि हुती या दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा बीमोड करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. यात अमेरिका, रशिया यासारख्या महासत्तांची भूमिका महत्त्वाची आहे, असंही दिवाकर देशपांडे यांनी सांगितलं.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications