Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घरात उकरलं तरी सोनं अन् दारात उकरलं तरी सोनं..! असं ठिकाण जेथं आहे सोनेच सोने; वाचा रंजक माहिती

सध्या देशभर सोन्याचीच चर्चा सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात मोठी कपात झाली. आता येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव हे सामान्यांच्या आवाक्यात येतील, अशीही चर्चा सुरु झालीय. सोन्याची चर्चा होत असताना आता जगातील अशा काही देशांची चर्चा सुरु झाली आहे. जेथे सोनेच सोने आहे. अगदी कुणालाही ते सापडू शकते. जेव्हा जेव्हा सोन्याने समृद्ध देशांबद्दल चर्चा होते तेव्हा दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया किंवा चीनची नावे प्रथम लक्षात येतात. पश्चिम आफ्रिकन देशांकडेही सोन्याचा मोठा खजिना आहे. हा परिसर प्राचीन काळापासून सोन्याच्या खाणी आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

Gold mines in African countries

सोन्याची भूमी कोणती?

अफ्रिकन देश असणाऱ्या घाणाला सोन्याची भूमी असे म्हटले जात. तेथे सोन्याचे साठे होते व आहेत की ते संपूर्ण जगाला सोने पुरवतात. २०२४ च्या अहवालानुसार जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनात पश्चिम आफ्रिकेचा वाटा सुमारे १०.८% आहे. पण या भागात इतके सोने का आहे? हा प्रश्न जितका सोपा आहे, तितकाच त्याचे उत्तरही तितकेच गुंतागुंतीचे आणि मनोरंजक आहे.

सोने कसे तयार होते?

अब्जावधी वर्षांपूर्वीच्या वैश्विक घटनांमुळे सोने निर्माण झाले, असे भुशास्त्रज्ञ सांगतात. विश्वाची निर्मिती होत असताना उच्च-ऊर्जा प्रक्रियेदरम्यान जड धातू तयार झाले. या धातूंमध्ये सोन्याचाही समावेश होता. सुमारे ३ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचे खंड आकार बदलत होते आणि एकमेकांवर आदळत होते तेव्हा मोठ्या प्रमाणात सोने जमा झाले होते.

आफ्रिकेत सोने कुठे आढळते?

पश्चिम आफ्रिकेतील वेस्ट आफ्रिकन क्रॅटन नावाचा परिसर सोन्याने समृद्ध आहे. हा जगातील सर्वात जुन्या भूगर्भीय प्रदेशांपैकी एक आहे. हे क्रॅटन घाना, माली, बुर्किना फासो, आयव्हरी कोस्ट, गिनी, सेनेगल आणि मॉरिटानियाच्या मोठ्या भागात पसरलेले आहे. यापैकी अनेक देशांची सुमारे ५०% जमीन या क्रॅटॉनवर वसलेली आहे. विशेषतः घाना, माली आणि आयव्हरी कोस्टमध्ये, सुमारे ३५% ते ४५% क्षेत्रात सोने आहे. पश्चिम आफ्रिकेतील बहुतेक सोन्याच्या खाणी सुमारे २.२ ते २.०८ अब्ज वर्षांपूर्वी एका मोठ्या भूगर्भीय घटनेदरम्यान तयार झाल्या होत्या.

किती सोने तयार होते?

घाना आणि माली हे या प्रदेशातील सर्वात मोठे सोने उत्पादक देश आहेत. घानामध्ये १,००० मेट्रिक टन सोने असल्याचा अंदाज आहे. हा देश दरवर्षी ९० मेट्रिक टन सोने काढतो, जे एकूण जागतिक उत्पादनाच्या ७% आहे. त्याच वेळी, मालीमध्ये ८०० टन सोन्याचा साठा आहे. २०२३ मध्ये देशात ६७.७ टन सोन्याचे उत्पादन झाले. जगातील सर्वात मोठ्या सोने उत्पादक देशांबद्दल बोलायचे झाले तर, चीनने २०२३ मध्ये ३७० मेट्रिक टन सोन्याचे उत्पादन केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ३१० मेट्रिक टन सोन्याचे उत्पादन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+