रिसाॅर्टमध्ये सापडले 12 भारतीयांचे मृतदेह! जॉर्जियातील घटनेने खळबळ, हे खूनसत्र की अजून काही?
Georgia indian restaurant 12 deaths : अमेरिकेत असंख्य भारतीय राहतात. त्यांच्यासाठी आणि भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गुडौरी, जॉर्जिया अमेरिकेतील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये एक दोन नव्हे तर चक्क 12 मृतदेह आढळले, यामुळे खळबळ उडाली आहे. हे खूनसत्र आहे की, अजून काही हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.
दरम्यान हाॅटेलमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहावर हिंसाचाराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, त्यामुळे हे प्रकरण नेमके काय याचे गुढच आहे.

काय म्हणाले जार्जियातील व्यवहार मंत्रालय?
जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या घटनेला जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत 'निष्काळजीपणाने जीवे मारण्याचे' प्रकरण मानले जात आहे. रिसाॅर्टचे कर्मचारी असल्याचे समजलेल्या पीडितांना दुसऱ्या मजल्यावर झोपवण्यात आले. प्राथमिक तपासात मृतदेहांवर हिंसाचाराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.
12 जणांचा मृत्यू
आदल्या संध्याकाळी वीज खंडित झाल्यानंतर जवळच्या बंद घरातील जागेत ठेवलेले जनरेटर वापरले गेले असावे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. मृतांमध्ये 12 भारतीय नागरिक आहेत. अहवालानुसार, पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ सखोल तपास करत आहेत.
अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले की "मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी संबंधित तपास आणि फॉरेन्सिक वैद्यकीय विश्लेषणाचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : अणुयुद्धाचा धोका वाढला! रशिया करणार युक्रेनमध्ये अणुबॉम्बचा वापर? अण्वस्त्र धोरणात अचानक बदल!
" रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी केली जात आहे आणि एकाच वेळी इतक्या लोकांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याची चौकशी केली जात आहे. अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य उघड करण्याचे आश्वासन दिले आहे. मृताची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा : भारताला अणुहल्ल्याची धमकी देताना शंभर वेळा विचार करेल पाकिस्तान












Click it and Unblock the Notifications