अणुयुद्धाचा धोका वाढला! रशिया करणार युक्रेनमध्ये अणुबॉम्बचा वापर? अण्वस्त्र धोरणात अचानक बदल!
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यामधील संघर्ष गेल्या दोन वर्षांपासून सुरूच असून युक्रेनने अद्यापही रशियासमोर हार मानलेली नाही. रशियाच्या अंतर्गत भूभागात दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांनी परवानगी दिल्यामुळे रशिया खवळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या देशाच्या आण्विक प्रणालीत आणि धोरणात मोठे बदल केले आहेत.
या बदलामुळे रशिया युक्रेनवर अणुहल्ला करील अशी शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला रशियात अंतर्गत मारा करण्याची तशी परवानगी दिली होती ज्यामुळे रशियाचा राग आणखी वाढला आहे.

जगात वाढला अणुयुद्धाचा धोका
रशियाने मंगळवारी आपल्या आण्विक धोरणात मोठे बदल केले. त्यानंतर रशिया कोणत्याही अण्वस्त्र सज्ज नसलेल्या देशाच्या आक्रमकतेवर गांभीर्याने विचार करणार आहे. एखाद्या अण्वस्त्र सज्ज देशाशी आक्रमक देशाचा समझोता होत असल्यास आणि संबंधित देश रशियावर हल्ला करीत असल्यास आपल्या अण्वस्त्र धोरणावर रशिया पुन्हा विचार करणार आहे. मंगळवारच्या घडामोडीमुळे अणुयुद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. रशियाच्या नव्या नीतीच्या अनुसार आता जागतिक स्थिती आणखी गंभीर होणार आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बातचीत करताना रशियाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की रशियाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या अनुसार कोणत्याही देशाने रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आपला अधिकार रशियाने सुरक्षित केला आहे. रशियाच्या धोरणात अण्वस्त्र प्रसार बंदी हा प्रमुख मुद्दा असला तरी ताज्या घडामोडीमुळे आपल्या विरोधात होणाऱ्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्याचे रशियाचे अधिकार आता अमर्यादित झाले आहेत
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ञांचे असे मत आहे की, बायडन यांनी युक्रेनला जी मोकळीक दिली त्याला रशियाने चोख प्रतिउत्तर दिले आहे. या संदर्भात रशियाने अगोदरच संकेत दिले होते आणि रशिया आणि युक्रेन युद्धाची तीव्रता रशियाच्या ताज्या निर्णयामुळे अनेक पटींनी वाढली आहे.
भारताने केले समझोत्याचे प्रयत्न
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न अनेक देशांनी केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांचा एकाच वेळी दौरा करून दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला. ही युद्धाची वेळ नाही, असे मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितले. अन्य देशांनी रशिया आणि युक्रेन यापैकी एका देशाशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठे परिणाम झाले असून पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. रशियाची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. भारताने मात्र रशियाशी आपले सर्व व्यवहार पूर्ववत ठेवले असून भारताचे हित पाहण्याचे संपूर्ण अधिकार भारत सरकारला आहेत, असे स्पष्ट उत्तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिले आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications