काय सांगताय! फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नव्हे 'पुरुष'?,जगभरात खळबळ, नेमकं प्रकरण काय
French President wife brigitte macron gender rumor : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी, फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या लिंगाविषयी पसरलेल्या खळबळजनक अफवेने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ब्रिजिट मॅक्रॉन या प्रत्यक्षात महिला नसून, लिंग बदल करून पुरुष झाल्याचा दावा करणाऱ्या दोन महिला युट्यूबर्सविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणाने फ्रान्सच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अफवेचा उगम अन् कोर्टात सुरू झाली लढाई?
या प्रकरणी डिसेंबर 2021 मध्ये अमांडिन रॉय नावाच्या युट्यूबरने पत्रकार नताशा रे ची मुलाखत घेतली. चार तासांच्या या मुलाखतीत नताशा रेने दावा केला की ब्रिजिट मॅक्रॉन या मूळतः पुरुष असून त्यांचे खरे नाव जीन-मिशेल ग्रोग्रँक्स आहे.
विशेष म्हणजे, हे नाव ब्रिजिटच्या भावाचे आहे आणि जीन-मिशेल व ब्रिजिट यांच्यात कमालीचे साम्य दिसून येते. नताशा रेने हा दावा करण्यासाठी तीन वर्षे संशोधन केल्याचेही म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली.

अखेर फर्स्ट लेडीने कोर्टात घेतली धाव!
नताशा रेनेच्या या दाव्यामुळे फर्स्ट लेडीने पॅरिसच्या न्यायालयात दोन्ही महिलांविरुद्ध खटला दाखल केला. सप्टेंबर २०२३ मध्ये न्यायालयाने दोन्ही महिलांना दोषी ठरवत ब्रिजिट मॅक्रॉन यांना ७ लाख रुपये आणि त्यांच्या भावाला ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
मात्र, १० जुलै रोजी पॅरिसमधील अपील न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. यामुळे ब्रिजिट मॅक्रॉन आणि त्यांच्या भावाने आता या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अमेरिकेतही प्रकरण चर्चेत, ट्रम्प समर्थकांचा नेमका डाव?
ही अफवा केवळ फ्रान्सपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती अमेरिकेतही वेगाने पसरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक पत्रकार कॅन्डेस ओवेन्स आणि टकर कार्लसन यांनी याला सर्वाधिक प्रसिद्धी दिली. दोघांनीही सोशल मीडियावर या संबंधित अनेक व्हिडिओ शेअर करत हा "मानवी इतिहासातील सर्वात मोठा राजकीय घोटाळा" असा दावा त्यांनी केला.
कॅन्डेस ओवेन्सने तर थेट दावा केला की ब्रिजिट मॅक्रॉन आणि तिचा भाऊ जीन-मिशेल ट्रोग्नेक्स हे प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहेत. म्हणजेच, ब्रिजिट पूर्वी जीन-मिशेल नावाचा पुरुष होता आणि नंतर लिंग बदलून ती महिला झाली. ओवेन्सने या दाव्यावर तिची संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठा पणाला लावली.
कायदेशीर नोटीस आणि मोहिमेचा सातत्य
ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या कायदेशीर टीमने या दाव्यांना गांभीर्याने घेतले. जानेवारी २०२५ मध्ये कॅन्डेस ओवेन्सला फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या वकिलांकडून कायदेशीर नोटीस मिळाली. त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, ब्रिजिट मॅक्रॉन यांना कोणालाही ती महिला असल्याचे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही आणि ओवेन्सचे वर्तन अपमानजनक आहे.
तरीही, ओवेन्स या संपूर्ण मोहिमेपासून मागे हटली नाही. तिने YouTube वर "Becoming Brigitte" नावाची एक व्हिडिओ मालिका चालवली, ज्यात तिने वारंवार ब्रिजिट मॅक्रॉनच्या लिंग ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ओवेन्सच्या मते, हे एक मोठे रहस्य आहे जे सरकार आणि मीडिया एकत्र लपवत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये, ओवेन्सने फ्रेंच पत्रकार झेवियर पौसार्डची मुलाखत घेतली, ज्यांनी "Becoming Brigitte" नावाचे पुस्तक लिहिले आहे आणि ते Amazon वर बेस्टसेलर देखील झाले.
या प्रकरणामुळे 'फेक न्यूज' आणि 'षडयंत्र सिद्धांत' कसे वेगाने पसरू शकतात आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या खासगी आयुष्यावर कसे परिणाम करू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील या खटल्याचा निकाल काय लागतो, आता याकडे संपूर्ण जगभराचे लक्ष लागलेले आहे.












Click it and Unblock the Notifications