ट्रम्पविरुद्ध एलोन मस्कने थोपटले दंड! नव्या राजकीय पक्षाची स्थापना; अमेरिकेच्या राजकारणात ट्विस्ट
Elon Musk's announcement : डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हापासून ते सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. एक्सचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात धनदांडग्यापैकी एक असलेले एलोन मस्क यांनी थेट दंड थोपटले आहेत, एलोन मस्क हे आधीच ट्रम्पविरोधात होते, त्यांच्या 'ब्युटीफूल' कायद्यालाही त्यांनी जोरदार विरोध केला होता.
आता अमेरिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे, त्याची सुरुवात आजपासून झाली असून एलोन मस्कने नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहयोगी आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी मोठी घोषणा करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले असुन अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पक्षव्यवस्थेपासून मुक्त करु - एलोन मस्क
एलोन मस्क यांनी शुक्रवारी 'अमेरिका पार्टी' या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की 'त्यांचा पक्ष अमेरिकेतील लोकांना पक्षव्यवस्थेपासून मुक्त करेल.' एलोन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाढत्या सार्वजनिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही अनपेक्षित घोषणा आली आहे.
काय म्हणाले एलोन मस्क?
टेस्लाच्या सीईओने सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, '२:१ च्या प्रमाणात, तुम्हाला एक नवीन राजकीय पक्ष हवा आहे आणि तुम्हाला तो मिळेल! आज, तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी अमेरिका पार्टीची स्थापना झाली आहे.' आश्चर्याची बाब म्हणजे एलोन मस्कने ट्रम्पच्या पुनर्निवडणुकीच्या मोहिमेत लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली होती आणि ट्रम्पच्या DOGE चे नेतृत्व देखील केले होते.
ट्रम्प-एलोन मस्कचे कुठे संबंध बिघडले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी कर कपात आणि खर्च विधेयक आणले. इतकेच नाहीतर त्यावर स्वाक्षरी केली.'द वन बिग ब्युटीफुल बिल'असे त्याचे नाव असून या व्यापक कर कपातीच्या विधेयकामुळे एलोन मस्क आणि ट्रम्प यांचे संबंध बिघडले. ट्रम्प यांनी एलोन मस्क यांना धमकी दिली होती, ज्यात मस्कच्या कंपन्यांना संघीय अनुदानात कपात करु असे ट्रम्प यांनी धमकावले याला मस्क यांनी जोरदार विरोध केला होता, त्यातून हा वाद आणखी वाढला.
लोकप्रतिनिधीला हटवण्यासाठी करतील पैसे खर्च
एलोन मस्क यांनी यापूर्वी म्हटले होते की 'ते एक नवीन राजकीय पक्ष सुरू करतील आणि विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधीला काढून टाकण्यासाठी पैसे खर्च करतील.'
पोलपोस्टमध्ये मस्क यांना जोरदार पाठींबा
मस्क यांनी ४ जुलै रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात एक्स वर एक पोल पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता - 'स्वातंत्र्य दिन हा एक पक्षीय व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे आहे का हे विचारण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे का? आपण अमेरिकेला पक्ष बनवावे का?' हा बदल आवश्यक होता', लोकांनी त्याचे समर्थन केले ज्यामध्ये ६५.४% लोकांनी 'होय' तर ३४ टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले. मस्कला अनेक लोकांनी पाठिंबा दिला आहे. यात 'हा बदल आवश्यक होता'असे एका युजर्सने लिहिले तर अशीच अनेक उत्तरे युजर्सकडून पोस्ट झाली.












Click it and Unblock the Notifications