Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Donald Trump's New Tariffs : भारताला मोठा धक्का, ट्रम्पंचा टॅरीफ हल्ला! हा घेतला नुकसानदायी निर्णय

Donald Trump's New Tariffs : चक्रावणारी धोरणं अवलंबवत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज जगाला धक्के देत आहेत. टॅरीफवर वेगवेगळी वक्तव्य करत ते काही दावेही करत आहेत. त्यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे अमेरिकेबद्दल जगातील राष्ट्रांत अविश्वास निर्माण होत असून आताच ताज्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टॅरीफसंदर्भात एक मोठा निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे जगभरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Donald Trump s New Tariffs

काय आहे ट्रम्प सरकारचा निर्णय?

डोनाल्ड ट्रम्प सरकारने १ ऑक्टोबर २०२५ पासून परदेशी औषधे, फर्निचर आणि मोठ्या ट्रक्सवर प्रचंड आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. हा निर्णय भारतीय औषधनिर्माण आणि निर्मिती क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे औषधांच्या किमती वाढून महागाईला चालना मिळण्याचा धोका आहे.

ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

या निर्णयामागे ट्रम्प यांनी देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देणे आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या बाजारपेठेत आता परदेशी कंपन्यांची मनमानी चालणार नाही. अमेरिकेतील उद्योग आणि कामगारांचे हित जपण्याचा हा निर्णय आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

औषधांवर १००% टॅक्स

ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, सर्व ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांवर १००% टॅरिफ आकारला जाईल. मात्र, ज्या परदेशी कंपन्यांनी अमेरिकेत कारखाने सुरू केले आहेत किंवा ज्यांचे बांधकाम सुरू आहे, त्यांना या टॅक्समधून सूट दिली जाईल. यामुळे परदेशी औषध कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील आणि देशाची औषध उत्पादन क्षमता वाढेल, असा त्यांचा दावा आहे.

फर्निचर आणि ट्रक्सवरही शुल्क

यासोबतच, किचन कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीवर ५०% तर अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३०% आयात शुल्क लागू होईल. ट्रम्प यांचा आरोप आहे की परदेशी कंपन्या या उत्पादनांचा 'पूर' अमेरिकन बाजारपेठेत आणत आहेत, ज्यामुळे स्थानिक उद्योगांचे नुकसान होत आहे.

त्याचप्रमाणे, परदेशात तयार होणाऱ्या मोठ्या ट्रक्सवरही २५% टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. यामुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर आणि मॅक ट्रक्स यांसारख्या अमेरिकन ट्रक कंपन्यांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण मिळेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

महागाई वाढण्याची शक्यता

विशेषज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा हा निर्णय देशांतर्गत उद्योगांना जरी दिलासा देणारा असला, तरी सामान्य नागरिकांसाठी अडचणी वाढवू शकतो. अमेरिकेत आधीच महागाईने उच्चांक गाठला आहे आणि या नव्या शुल्कामुळे अत्यावश्यक वस्तू आणखी महाग होऊ शकतात. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार असून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+