Donald Trump xi jinping : 6 वर्षांनी ट्रम्प-जिनपिंग भेट! वाद-विवाद अन् कशावर चर्चा? वाचा 5 मुद्द्यात
Donald Trump xi jinping meet update : वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणाव वाढत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहा वर्षांनंतर दक्षिण कोरियातील बुसान येथे महत्त्वपूर्ण भेट घेतली. दोन्ही जागतिक महासत्तांच्या प्रमुखांमधील या थेट संवादामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर आणि व्यापार-तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे.

'एका महान देशाचे महान नेते' असे ट्रम्प यांनी जिनपिंग यांना संबोधले, तर जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उच्चस्तरीय भेटीचे प्रमुख फलित काय हे जाणून घेऊया.
शी जिनपिंग-ट्रम्प भेटीचे ५ महत्त्वाचे फलित
1.द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची प्रतिज्ञा
दोन्ही नेत्यांनी अमेरिका-चीन संबंधांना 'योग्य दिशेने' नेण्याची आणि स्थिर पायाभूत संबंध निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी, 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या ट्रम्प यांच्या दृष्टिकोनासोबत चीनचा विकास हातात हात घालून पुढे जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
2. व्यापार-आर्थिक समस्यांवर मूलभूत एकमत
या भेटीपूर्वी दोन्ही देशांच्या आर्थिक आणि व्यापार प्रतिनिधींच्या चर्चेतून त्यांच्या संबंधित प्रमुख चिंतांवर 'मूलभूत एकमत' झाले आहे. तसेच 'प्रोत्साहन देणारी प्रगती' झाली असून, या भेटीसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली होती, यावर जिनपिंग यांनी जोर दिला.
3. जागतिक शांततेसाठी ट्रम्प यांचे कौतुक
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या जागतिक शांततेच्या प्रयत्नांसाठी, विशेषतः 'गाझा युद्धविराम करारावर' झालेल्या यशस्वी कराराबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच, कंबोडिया-थायलंड सीमा विवाद शांतता करारात ट्रम्प यांनी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
4. महत्त्वाच्या खनिजांवर चर्चा
व्यापार तणावाचे प्रमुख कारण असलेल्या 'रेअर अर्थ मिनरल्स' या महत्त्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या या खनिजांच्या पुरवठा साखळीतील समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जाईल.
5. संवादाच्या माध्यमातून मतभेद निवारण
'भिन्न राष्ट्रीय परिस्थिती'मुळे दोन्ही देशांमध्ये मतभेद असणे सामान्य आहे. मात्र, जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असल्याने त्यांच्यातील वाद-विवाद चर्चेच्या माध्यमातून आणि योग्य मार्गदर्शनाखाली हाताळले जावेत, यावर दोन्ही नेत्यांनी जोर दिला.












Click it and Unblock the Notifications