Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांनी दाखवला रंग! USAID निधीबद्दल म्हणाले-'भारताकडे खूप पैसा, आम्ही 21 दशलक्ष डॉलर्स का देऊ?

Donald Trump on USAID fund : अमेरिकेत जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली त्यानंतर काही टोकाचे निर्णय घेऊन सर्वांनाच ट्रम्प यांनी चक्रावून सोडले आहे. खासकरुन भारताविषयीचे निर्णय, इमिग्रेशन पाॅलिसी असो की इतर काही यामुळे भारतीय अडचणीत येत आहेत. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक थेट वक्तव्यच केले आहे, या वक्तव्याची चर्चा होत आहे.

'व्होटिंग इन इंडिया'साठी राखून ठेवलेला 21 दशलक्ष डॉलर्सचा निधी यूएस सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाने (DOGE) थांबवला आहे. यूएस फंडिंग थांबवण्याच्या DOGE च्या निर्णयाच्या बाजूने बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क 'आम्ही भारताला 21 दशलक्ष डॉलर्स का देत आहोत? त्याच्याकडे खूप पैसे आहेत.'असे म्हणत आपले भारताविषयीचे इरादे स्पष्ट केले आहेत.

Donald Trump on USAID fund

भारतातील मतदानासाठी राखून ठेवले होते US$21 दशलक्ष

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आमच्या बाबतीत भारत जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. आम्ही तिथं कमीच पोहोचू शकतो कारण त्यांचे दर खूप जास्त आहेत. मी भारताचा आणि पंतप्रधानांचा खूप आदर करतो, पण मतदानासाठी 21 दशलक्ष डॉलर्स का द्यावे? अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मार-ए-लागो येथे कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना हे सांगितले. 6 फेब्रुवारी रोजी, DOGE ने यूएस करदात्यांनी अर्थसहाय्यित प्रकल्प रद्द करण्याच्या तपशीलवार सूची जारी केली. यापैकी एक US$21 दशलक्ष "भारतातील मतदानासाठी" राखून ठेवलेला होता.

हेही वाचा : अमेरिकेतील 7.25 लाख भारतीयांना ट्रम्प यांनी दाखवला देशाबाहेरचा रस्ता, नागरिकांना घेऊन विमान रवाना

रक्कम कपात करण्याचा निर्णय

एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील विभागाने शनिवारी हा निर्णय जाहीर केला. DOGE ने सांगितले होते की अमेरिकेने भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तयार केलेल्या $20 दशलक्ष कार्यक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बातमीनुसार, अमेरिकेने भारतातील निवडणुकांदरम्यान मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी 20 दशलक्ष डॉलर्स दिले होते. पण, आता भारताला हा निधी मिळणार नाही.

भाजपची प्रतिक्रीया काय?

यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. या घोषणेवर अमित मालवीय यांनी X रोजी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अशा प्रकारच्या वित्तपुरवठ्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले, "मतदारांना मतदान करण्यासाठी $21 दशलक्ष? हा भारताच्या निवडणूक प्रक्रियेत नक्कीच बाहेरचा हस्तक्षेप आहे. याचा फायदा कोणाला होईल? सत्ताधारी पक्षाला नक्कीच नाही!"

हेही वाचा : अमेरिका आणखी 487 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करणार, परराष्ट्र मंत्रालयलाने दिली माहीती

बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करणे, ट्रम्प यांचे ध्येय

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच घोषणा केली होती की, ते अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम राबवतील. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने देशातून 1.5 दशलक्ष बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजना आखली आहे. यापैकी 18,000 भारतीय नागरिकांना प्राधान्याने हद्दपारीच्या यादीत टाकण्यात आले आहे.

हेही वाचा : '26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा लवकरच भारतात येणार', पंतप्रधान मोदी-ट्रम्प बैठकीत निर्णय

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+