ट्रम्प प्रशासनाचा दे धक्का; 'या' नियमामुळे हजारो भारतीय व्यावसायिकांच्या नोकरीवर टांगती तलवार!
Donald Trump New DHS Rule : अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) ने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
रोजगार अधिकृतता दस्तऐवजच्या स्वयंचलित विस्ताराचा नियम रद्द करण्यात आला आहे, जो गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या नियमामुळे पुन्हा भारतायींना झटका बसणार आहे. H-1B व्हिसा नियमांमधील बदलांनंतर ट्रम्प सरकारने घेतलेला हा आणखी एक मोठा निर्णय आहे, ज्यामुळे अमेरिकेतील भारतीय व्यावसायिकांच्या नोकरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

नियम काय सांगतो?
या नवीन नियमानुसार, ज्या परदेशी नागरिकांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर त्यांच्या EADs चे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना यापुढे स्वयंचलित विस्तार मिळणार नाही.
जुना नियम काय होता?
आतापर्यंत, कर्मचारी त्यांचा नूतनीकरण अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित असताना ५४० दिवसांपर्यंत त्यांचा रोजगार अधिकृतपणे सुरू ठेवू शकत होते. जर एखाद्या व्यक्तीचे सध्याचे EAD संपण्यापूर्वी नूतनीकरण मंजूर झाले नाही, तर त्यांनी ताबडतोब काम करणे थांबवावे लागेल. या निर्णयामुळे अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या परदेशी लोकांना आता EAD नूतनीकरणाच्या प्रक्रियेवर अनेक वेळा तपासणी करावी लागणार आहे.
DHS चे स्पष्टीकरण आणि भारतीयांवरील परिणाम!
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांनी यूएससीआयएस (USCIS) द्वारे गैर-अमेरिकन लोकांना सल्ला दिला आहे की त्यांनी त्यांचे EAD नूतनीकरण अर्ज वेळेवर आणि योग्यरित्या पूर्ण करावेत.
"परदेशी व्यक्तीने EAD नूतनीकरण अर्ज दाखल करण्यासाठी जितका जास्त वेळ वाट पाहावा, तितकाच त्यांचा रोजगार अधिकृतता किंवा कागदपत्रे तात्पुरती अवैध ठरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे EAD कालबाह्य होण्याच्या १८० दिवसांच्या आत अर्ज करणे अपेक्षित आहे."
भारतीयांना मोठा धोका!
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय नागरिक हे अमेरिकेतील स्थलांतरित कामगारांचा एक मोठा भाग आहेत आणि ते आधीच ग्रीन कार्ड आणि विविध व्हिसा अर्जांच्या प्रलंबित प्रक्रियेमुळे त्रस्त आहेत.
- OPT विद्यार्थी
- H-4 व्हिसा धारक (जे H-1B धारकांचे आश्रित आहेत)
- ग्रीन कार्ड अर्जदार (ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत)












Click it and Unblock the Notifications