ट्रम्पंनी भारतावर 25 टक्के टॅरीफ लादला! अमेरिकेला का खुपतेय भारताची रशियाशी सलगी? ही आहेत कारणे
Donald Trump imposed 25 percent tax on India : एकीकडे भारताचे गोडवे गायचे अन् पाकिस्तानसोबत ऐतिहासिक तेल करार करायचा मग भारतीय अर्थव्यवस्थेवर घाला घालत उत्पादनावर २५ टक्के टॅरीफ लादायचा ही कुटनिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरली आहे. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय उत्पादनावर २५ टक्के कर लादण्यात आला असून आता १ ऑगस्ट २०२५ म्हणजे उद्यापासून याची अंमलबजावणी होत आहे.

१ ऑगस्टपासून अमेरिकेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवर २५ टक्के जास्त कर लादला जाईल अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात घोषणावजा इशारा ट्रम्पनी दिला आहे. भारताची रशियाशी असलेली सलगी ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपत असून खास बाब म्हणजे रशियाशी भारताचे जवळचे संरक्षण आणि ऊर्जा संबंध आहेत, त्यामुळे ट्रम्प आणखी टॅरीफ आकारतील असा अंदाज आहे. भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार जरी असले तरीही हा नवा ताजा निर्णय व्यापार चर्चा कशा सुरू आहेत आणि रशियाशी भारताचे संबंध कसे आहेत याबद्दल अमेरिकेच्या निराशेकडे लक्ष वेधत आहे.
भारतावर कर का लादत आहे?
गुड रिटर्न्सच्या वृत्तानुसार, कर घोषणांनंतर; दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची अपेक्षा आहे, यामुळे जागतिक व्यापारावर याचा परिणाम होईल. अमेरिकेला भारताचे रशियाशी असलेले घनिष्ठ व्यापारसंबंध खुपत आहेत. कारण जगातील चौथी महासत्ता असलेल्या भारताची बाजारपेठ ही बलाढ्य आहे आणि भारत सर्वात मोठा आयातदार देश आहे. अशावेळी भारताने रशियाऐवजी आपल्यासोबत व्यापार व्यवहार वाढवावा ज्यामुळे अमेरिकेला मोठा फायदा होऊ शकेल असे वाटते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात जाणीवपुर्वक सक्त धोरण अवलंबवल्याचे तज्ज्ञ सांगतात. ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या संदेशात, भारताने भरपूर रशियन लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल आणि रशियन तेलावर जास्त अवलंबून राहिल्याबद्दलही टीका केली. यावरुन हे स्पष्ट होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर ठपका, एक्सवर पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्यासोबत तुलनेने कमी व्यवसाय केला आहे कारण त्यांचे कर खूपच जास्त आहेत, जगातील सर्वात जास्त कर आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठोर आणि आर्थिकदृष्ट्या चुकीचे व्यापारविषयक अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह रशियाचा ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमधील हत्याकांड थांबवावे असे वाटते - सर्व काही चांगले नाही! म्हणून भारत १ ऑगस्टपासून २५% कर भरेल, तसेच वरील दंड भरेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."
कर लादण्याचे हे आहे आणखी एक मुळ कारण
अमेरिकेतील व्यवसायांनी बऱ्याच काळापासून तक्रार केली आहे की, भारत उच्च आयात कर आकारून आणि विशेषतः शेती, दुग्धजन्य पदार्थ आणि ऑनलाइन शॉपिंगसारख्या क्षेत्रात खूप जास्त नियम तयार करून व्यापार करणे कठीण करत आहे. २०२५ मध्ये अनेक बैठकींनंतरही, दोन्ही देश पूर्ण व्यापार करारावर सहमत होऊ शकले नाहीत, ज्यामुळे निराशा निर्माण झाली. अहवालांनुसार, भारत आता रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो, त्याच्या एकूण आयातीपैकी जवळजवळ ४०%, बहुतेकदा स्वस्त दरात. अमेरिकन अधिकारी याबद्दल नाराज आहेत कारण त्यांना वाटते की यामुळे युक्रेनमधील रशियाच्या युद्धाला निधी मिळण्यास मदत होते.












Click it and Unblock the Notifications