Plane Crash : डीएचएल मालवाहू विमान निवासी भागात कोसळले, लँड करताना भीषण अपघात

Plane Crash : लिथुआनियामधील विल्नियस विमानतळाजवळ DHL मालवाहू विमान कोसळले आहे. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. यात एका जणाचा जागीच जीव गेला आहे. अपघातानंतर, विमानतळाच्या धावपट्टीच्या उत्तरेला 1.3 किमी अंतरावर असलेल्या इमारतीतून प्रचंड धूर निघत होता. अखेर त्या ठिकाणी अग्निशम दलास पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, अपघाताच्या नंतर आजूबाजूला मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. रुग्णवाहिका दिसली असून परिसरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आलेले आहेत.

लिथुआनियामध्ये मालवाहू विमान क्रॅश झाले DHL च्या वतीने स्विफ्ट एअरलाइन्सने चालवलेले विमान लाइपझिग येथून उड्डाण घेतले आणि एका घरावर कोसळले, असे सरकारी नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट सेंटरच्या प्रवक्त्यानी सांगितले.

Cargo plane crash in Lithuania

लिथुआनियाच्या सार्वजनिक प्रसारक एलआरटीने आपत्कालीन अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अपघातानंतर दोन लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आणि एकाला नंतर मृत घोषित करण्यात आले. एलआरटीने सांगितले की, विमान विमानतळाजवळील एका दुमजली घरावर कोसळले.

त्याचवेळी, लिथुआनियन विमानतळ प्राधिकरणाने या विमानाची ओळख "लीपझिग, जर्मनीहून विल्नियस विमानतळाकडे उड्डाण करणारे DHL मालवाहू विमान" म्हणून केली आहे.

घटनास्थळावर अग्निशमन

सोशल प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आहे की, अग्निशमन ट्रकसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी आहेत. जर्मनीतील बॉन येथे मुख्यालय असलेल्या DHL समूहाने तात्काळ अपघातावर भाष्य केले नाही, परंतु नंतर पोस्ट केले की उड्डाणे पूर्ववत सुरू झाली आहेत.

तुर्कस्तानच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, आज सकाळी दक्षिण तुर्कीमधील अंतल्या विमानतळावर उतरल्यानंतर 95 जणांना घेऊन जाणाऱ्या रशियन विमानाच्या इंजिनला आग लागली. सर्व प्रवासी आणि चालक दलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अझिमुथ एअरलाइन्सद्वारे संचालित सुखोई सुपरजेट 100 प्रकारच्या विमानाने रविवारी सोची येथून उड्डाण केले आणि त्यात 89 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते, असे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+