INSTC व्यापारी मार्गाने भारतात इराणमार्गे प्रथमच पोहोचला कोळसा ; अमेरिकेला धक्का?
INSTC व्यापारी मार्ग अर्थात इंटरनॅशनल नॉर्थ - साऊथ कॉरिडॉर. हा मार्ग भारत - रशिया यांच्यातील रेल्वे, रस्ते मार्गाचे व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो.

रशियाने कोळशाची एक खेप नवीन कॉरिडॉरद्वारे इराणमार्गे भारतात पोहोचवली आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. रशियाने इराणमधून जाणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरद्वारे कोळशाने भरलेल्या दोन गाड्या भारतात पाठवल्या आहेत, अशी घोषणा रशियन नॅशनल रेल्वे कंपनीने केली आहे.
अमेरिकेला धक्का:
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आपल्या हितसंबंधांसाठी अमेरिकेच्या धमक्यांकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष करत आहे, त्यावरून भारत जगामध्ये आपला दबदबा कसा प्रस्थापित करत आहे हे दिसून येते. आणि ही भारत-रशिया संबंधांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे.
रेल्वेच्या साहाय्याने हा कोळसा
कझाकस्तानमार्गे इराणच्या अब्बास बंदरापर्यंत पोहोचविण्यात आला. पुढे जहाजाच्या साहाय्याने समुद्रमार्गे हा कोळसा भारताकडे पाठविण्यात येत आहे. याबाबत रशियन रेल्वे कंपनीने माहिती जारी केली आहे.
कसा आहे कॉरिडॉर:
INSTC हा सेंट पीटर्सबर्ग ते भारताच्या मुंबई बंदराला जोडणारा 7,200 किमी लांबीचा बहुविध मार्ग आहे. ज्यामध्ये रेल्वे, रस्ते नेटवर्क आणि बंदरे यांचा समावेश आहे. कॉरिडॉर हा पाश्चात्य निर्बंधांना उत्तर म्हणून नवीन वाहतूक मार्ग स्थापित करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्याने मॉस्कोला युरोपमधून मध्य पूर्व आणि आशियामध्ये माल पाठवण्यासाठी व्यापार मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार
मे अखेरीस संपलेल्या तीन महिन्यांत रशियन कोळशाच्या आयातीत घट झाली आहे. तर अमेरिकेच्या शिपमेंटमध्ये वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी याचे कारण रशियाने पुरवठा कमी केला आहे. असे सांगितले आहे.
रशियाची भारताला होणारी एकूण कोळशाची निर्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 22.4% कमी होऊन 6.76 दशलक्ष मेट्रिक टन झाली आहे.
भारताने इराणच्या चहबार बंदरातून रशिया आणि इतर मध्य आशियाई देशांतून कोकिंग कोळसा आयात करण्याची योजना आखल्याचे संकेत आहेत. सध्या रशियातील कोळसा लाल समुद्राच्या मार्गाने भारतात येतो.












Click it and Unblock the Notifications