China Vs USA: चीन - अमेरिका आमनेसामने; तणाव वाढला, भारतासाठी वचपा काढण्याची संधी?
Mumbai: जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका (USA) आणि चीन (CHINA) या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव वाढला आहे. हिंद महासागर आणि पॅसिफिक (Indo - Pacific) समुद्रात सामरिक दृष्ट्या पिछाडीवर पडलेल्या अमेरिकेने आता मोठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.

तिबेट पठारावरून अमेरिका आक्रमक (Tibet plateau)
तिबेट पठाराच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आधीच तैवानच्या मुद्द्यावर ताणले गेलेले व्यापारी संबंध (International Trade) त्यात आता तिबेट प्रकरणाची भर पडली आहे.
तिबेट प्रकरण निकाली काढण्यासाठी अमेरिकेची दलाई लामा यांच्यासोबत चर्चा देखील सुरू आहे. यामुळे, चीनच्या विस्तारवादी धोरणाला खीळ बसणार आहे.
भारताची अमेरिकेला साथ (India stands with USA)
अमेरिकेच्या ज्या शिष्टमंडळाने दलाई लामा यांची भेट घेतली. त्या अमेरिकेच्या शिष्टमंडळासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीत बैठक केली. यामुळे चीनच्या भुवया उंचावल्या.
भारताने बराच मोठा काळ अध्यात्मिक गुरू दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांची पाठराखण केली आहे. 2003 मध्ये भारताने तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता दिली असली तरी आता भारत आगामी काळात आपली भूमिका बदलण्याची शक्यता आहे.
तिबेट - अमेरिका - चीन वादाचा इतिहास: Resolve Tibet Act
प्रसिद्ध इतिहासकार हारुक बेकमियर यांनी या वादावर प्रकाश टाकला आहे. History 363 या लेखमालेत त्यांनी याबद्दल उहापोह केला आहे. तिबेटवर चीनने आजवर अनेकदा आपला दावा केला असला तरी वेळोवेळी या ठिकाणाचे महत्व लक्षात घेत अमेरिकेने हा दावा खोडला. याबाबत अमेरिकेने Resolve Tibet Act देखील बनवला आहे.
तिबेट हा प्रदेश चीनच्या दक्षिण - पश्चिम भागात स्थित आहे. भारत, नेपाळ, भूतान या राष्ट्रांना लागून तिबेटची सीमा आहे. 1949 ते 1959 या काळात चीनने तिबेट वर कब्जा केला.
नंतरच्या काळात भारतामध्ये स्थलांतर करत तिबेट धर्मगुरू दलाई लामा यांनी चीन विरोधात भूमिका घेतली होती. 1974 नंतर या प्रकरणात मवाळ झालेल्या अमेरिकेने आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारतासाठी चीनला शह देण्याची संधी
वेळोवेळी व्यापार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताविरोधात कुरापती करणाऱ्या चीनला कोंडीत पकडण्याची संधी यानिमित्ताने भारतासमोर आली आहे. त्यामुळे आता भारताचे परराष्ट्र खाते याबाबत काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications