बांगलादेशचे ते मनमोहक सेंट मार्टीन बेट कुठेय? ज्यासाठी अमेरिका करत होती शेख हसीनासोबत डील! वाचा
नवी दिल्ली - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपले सरकार पडल्यानंतर प्रथमच आपली प्रतिक्रीया दिली. आपल्या देशात अंतर्गतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्यासाठी त्यांनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. बांगलादेशचे सेंट मार्टिन बेट अमेरिकेच्या ताब्यात न दिल्याने आपल्याला सत्तेतून हद्दपार व्हावे लागले असा आरोप शेख हसीना यांनी केला आहे.
आपल्या जवळच्या सहकाऱ्यांमार्फत प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या संदेशात त्यांनी हा आरोपवजा दावाही केला आहे.

काय म्हटल्या शेख हसीना?
'मला मृतदेहांचा ढीग बघावा लागू नये म्हणून मी राजीनामा दिला आहे. जर मी सेंट मार्टिन बेटाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या स्वाधीन केले असते तर मी सत्तेत राहू शकले असते. पण मुळातः बंगालच्या उपसागरात असलेल्या एका छोट्या बेटाला अमेरिकेला ताब्यात घेऊन काय फायदा होणार हा प्रश्न आहे?
कुणी वसवले हे बेट?
वास्तविक, सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक लहान (फक्त 3 चौरस किमी) बेट आहे, कॉक्स बाजार-टेकनाफ द्वीपकल्पाच्या दक्षिणेला सुमारे 9 किमी आणि बांगलादेशचे सर्वात दक्षिण टोक तयार करते. हजारो वर्षांपूर्वी हे बेट टेकनाफ द्वीपकल्पाचा विस्तारित भाग होता. टेकनाफ द्वीपकल्पाचा काही भाग नंतर पाण्याखाली गेला आणि त्याचा दक्षिणेकडील भाग अशा प्रकारे मुख्य भूभाग बांगलादेशपासून वेगळा झाला आणि एक बेट बनले. हे बेट 18 व्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी प्रथम वसवले होते. त्याचे नाव त्यांनी 'जझीरा' ठेवले.
अमेरिकेला भारत, चीनवर नियंत्रण ठेवायचेय का?
अमिरेकेला या बेटात रस यामुळेच आहे की, चीन आणि भारत हे आशिया खंडातील दोन सर्वात शक्तिशाली देश आहेत. या दोन्ही देशांना आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या जगात खूप महत्त्व आहे आणि आगामी काळात या देशांचा प्रभाव आणखी वाढणार आहे. स्वतःला जगाचे केंद्रस्थान ठेवण्यासाठी चीन आणि भारत या दोघांवरही नियंत्रण ठेवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. या कामासाठी त्याला या प्रदेशात एक जागा हवी आहे, जिथे तो आपला सेटअप उभा करू शकेल. त्यामुळे त्याची नजर बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावर आहे.
अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक पाश्चिमात्य देश बांगलादेश, म्यानमार आणि भारताच्या काही भागांवर ख्रिश्चन राज्य निर्माण करण्याचा कट रचत आहेत, असे भू-राजकारणातील तज्ज्ञ सांगत आहेत.
हसीनांकडून एका मोठ्या कटाचा खुलासा
बांगलादेश आणि म्यानमारचा काही भाग घेऊन 'पूर्व तिमोरसारखा ख्रिश्चन देश' निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचेही शेख हसीना यांनी काही काळापूर्वी म्हटले होते. मात्र, त्यांनी भारताचे नाव घेणे टाळले. त्यांनी असेही म्हटले होते की एका गोऱ्या व्यक्तीने (इंग्रज) त्यांना या वर्षी 7 जानेवारी रोजी झालेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्याही अडचणीशिवाय जिंकण्याची ऑफर दिली होती.
तेव्हा शेख हसीना सेंट मार्टिन बेटाचे नाव न घेता म्हणाल्या होत्या, 'प्राचीन काळापासून आखाती आणि हिंदी महासागरातून व्यापार होत आहे. या जागेवर अनेकांची नजर असते. येथे कोणताही वाद आणि संघर्ष नाही. मी हे होऊ देणार नाही. आणि हा देखील माझा एक गुन्हा आहे असं शेख हसीना यांनी त्यांच्या बाजूने स्पष्ट केलं आहे.
सत्ताबदलासाठी अमेरिकेला ठरवले जबाबदार
आता हसीनाच्या निकटवर्तीय अवामी लीगच्या काही नेत्यांनीही ढाक्यातील सत्ताबदलासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. अमेरिकन मुत्सद्दी शेख हसीना यांच्यावर चीनविरोधात पुढाकार घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अवामी लीगच्या नेत्यांनी जुलैमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणारे यूएस राजदूत पीटर हास यांच्यावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या बाजूने असल्याचा आरोप केला आहे.
सेंट मार्टिन बेटावर सुमारे 3700 रहिवासी
सेंट मार्टिन युनियन कौन्सिल ही बेटावरील प्रशासकीय काम पाहते. त्यात 9 गावे आहेत. बेटावर अंदाजे 3,700 रहिवासी प्रामुख्याने मासे विकून उदरनिर्वाह करतात. येथील मुख्य पिके भात आणि नारळ आहेत. ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान, शेजारील भागातील मच्छीमारी हा व्यवसाय आहे.
बेटाच्या मध्यभागी आणि दक्षिण भागात मुख्यतः शेत आणि तात्पुरत्या झोपड्या आहेत, बहुतेक कायमस्वरूपी बांधकामे उत्तर भागात बांधलेली आहेत. बंगालच्या उपसागरातील पावसाळ्यात धोकादायक परिस्थितीमुळे सेंट मार्टिन बेटाचा मुख्य भूमीपासून (टेकनाफ) संपर्क तुटलेला असतो.












Click it and Unblock the Notifications