Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानातील 'या' गटाचा भारताला पाठिंबा! युद्ध झालंच तर पाकड्यांना घेरणार! मास्टरप्लॅनही तयार

Balochistan Liberation Army will support India : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाचा बनला आहे. आता भारत कोणत्याही स्थितीत मागे हटणार नाही आणि पाकिस्तानने यापुढे हल्ला केला तर भारत आपली कारवाई अधिक जोमाने सुरु ठेवेल असा इशाराच भारताने पाकिस्तान आणि अमेरिकेलाही दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर आपण मध्यस्ती केली आणि युद्धविराम झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर भारत पाक यांनी युद्धविरामही घोषित केला होता पण पाकड्यांनी काही तासांतच शस्त्रसंधी तोडली आणि गोळीबार सुरु केला. त्यानंतर सीमा सुरक्षा बलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश आले. पाकिस्तानची खोड मोडत नाही म्हणूनच भारतीय उच्चपदस्तांनी पाकिस्तानच्या कोणत्याही कृत्याला सडेतोड उत्तर देऊ आणि ऑपरेशन सिंदूर थांबवलेले नाही. दहशतवादाविरूद्धचा लढा सुरुच राहील असेही म्हटले आहे.

Balochistan Liberation Army will support India

यानंतर आता पाकिस्तानातूनच एक बातमी आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. स्वतंत्र बलुच राष्ट्रासाठी या आर्मीचे प्रयत्न आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या बलुच भागातील नागरिकांच्या विशिष्ट मागण्या होत्या पण पाक सरकारने त्यांच्या मागण्या तर मान्य केल्याच नाही उलट तिथे अत्याचार सुरु केले, दरम्यान आता पुन्हा बलुचिस्तान देशाची निर्मिती करावी यासाठी लढा सुरु झाला आहे. यातच गेल्या काही काळात पाकिस्तानी रेल्वे बलुच आर्मीने हायजॅक केली होती, यानंतर पाकिस्तानचे सैनिकही या आर्मीने मारले होते अशातच आता बलुचिस्तान मास्टरप्लॅन करत असल्याचे वृत्त आहे.

काय आहे बलुचिस्तानचा मास्टरप्लॅन

एबीपी माझाने बलुचिस्तानच्या मास्टरप्लॅनसंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, पाकिस्तानविरोधी लढा लढणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी युद्ध झाल्यास भारताला पाठिंबा देणार आहे, यासह पाकिस्तानी सैन्यांना मिळेल त्या मार्गाने अडचणीत आणण्याचे प्रयत्न ते करत आहेत.

..तर पश्चिम दिशेने पाकिस्तानला घेरणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जर निर्णायक लढाई झाली तर बलुच आर्मी भारताला सहाय्य करेल. लढाईच्या स्थितीत ते पश्चिम सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करतील. भारताने लढाई केल्यास या कृतीचे आम्ही स्वागत करु आणि त्यांच्यासोबत लष्करी ताकद म्हणून उभे राहू असेही बलुच आर्मीच्या या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा : Gold Price today भारत पाकिस्तान युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठे फेरबदल? आजचे ताजे भाव काय जाणून घ्या

हेही वाचा : 'युद्ध झाल्यास मी इंग्लडला पळून जाईल' पाकिस्तानी खासदार म्हणतो - PM मोदी हे माझ्या मावशीचे..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+