'युद्ध झाल्यास मी इंग्लडला पळून जाईल' पाकिस्तानी खासदार म्हणतो - PM मोदी हे माझ्या मावशीचे..
India Pakistan Conflict : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत. अशातच पाकिस्तानने आपल्या हद्दीत भारतीय विमानांना मज्जाव केला आहे तर दुसरीकडे भारतानेही पाकिस्तानला आपली बंदरे आणि हवाई हद्दीत येण्यास मज्जाव केला.

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानच्या सैनिकांनी गोळीबार केला, यालाही भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांवर युद्धाचे ढग असताना आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे दिसते.
वृत्त असे आहे की, पाकिस्तानातील राजकीय नेते, लष्करी अधिकारी आपापल्या कुटुंबाना परदेशात पाठवत आहेत, भारत कधीही लक्ष्य करु शकतो अशी शक्यता त्यांना वाटते. अशातच पाकिस्तानच्या खासदाराचे वक्तव्य समोर आले आहे. या वक्तव्याने पाकिस्तानची किती गांगरली हेही समजून येईल.
काय म्हणाले पाकिस्तानी खासदार?
पाकिस्तानी खासदार शेर अफजल खान मारवत हे इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाचे असून त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की, भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास काय कराल? त्यावर पाकिस्तानी खासदार शेर अफजल खान म्हणाले, "जर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाल्यास आणि तणाव वाढला तर मी इंग्लंडला पळून जाईल."
"पीएम मोदी हे माझ्या मावशीचे.."
शेर अफजल खान यांना पत्रकारांनी आणखी एक प्रश्न विचारला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षाच्या पार्श्वभुमीवर संयम बाळगायला हवा का? यावर शेर अफजल खान म्हणाले "नरेंद्र मोदी हे माझ्या मावशीचा मुलगा आहे का, की ते मी म्हणालो तर मागे हटतील?" असा उलट सवाल शेर अफजल खान यांनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
शेर अफजल खान मारवत यांचे वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लोक यावर प्रतिक्रीया देत आहेत, एका युजर्सने म्हटले की, "जेव्हा पाकिस्तानी नेत्यांना त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही तर सामान्य माणसांनी कशी अपेक्षा ठेवायला हवी?" शेर अफजल खान हे टीका करण्यात आणि पक्षनैतृत्वावर तोंडसुख घेण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून त्यांना इम्रान खान यांनी पक्षातील महत्वाच्या पदावरुन काढले आहे.
हेही वाचा : Asaduddin Owaisi: आधी आरशात तोंड पाहा.. असुदोद्दीन ओवैसींनी पाकिस्तानची औकातच काढली! Video बघा
हेही वाचा : मोठी बातमी : पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आर्मी चीफचा हात; Pakच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा दावा












Click it and Unblock the Notifications