Asaduddin Owaisi: आधी आरशात तोंड पाहा.. असुदोद्दीन ओवैसींनी पाकिस्तानची औकातच काढली! Video बघा
Asaduddin Owaisi : पाकिस्तान भारताला कधीच शांततेत राहू देणार नाही. आपण यांना चोख उत्तर देण्याची आज वेळ आहे असे म्हणत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानची पुरती औकातच काढली. आधी आरशात तोंड पाहा असे ते म्हणाले.
ओवैसींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी पाकिस्तानचे कान टोचले आणि मिसाईल टेस्ट आणि कुरापतीविरोधात सनसनीत उत्तर दिले.

काय म्हणाले असदु्द्दीन ओवैसी?
असदु्द्दीन ओवैसी म्हणाले, लक्षात ठेवा जेव्हा भारताकडे कुणी बोट दाखवतो त्यावेळी आम्ही आमचे राजकारण आणि सर्व गोष्टी विसरुन भक्कम दरवाजासारखे शत्रूंविरोधात उभे राहतो. आम्ही या सर्व लोकांना सांगतो की, आज तुम्ही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले आहे. मला विश्वास आहे की, ज्या निष्पापांचा बळी गेला त्यांचे रक्त व्यर्थ जाणार नाही.
भारत पाकिस्तान से ताक़तवर था, है और इंशाअल्लाह हमेशा रहेगा!pic.twitter.com/wwW5aHlNK1
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 3, 2025
आधी आरशात पाहा...
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मी सांगतो की, भारत सरकारने हा निर्णय घेतला की, पाकिस्तानची जहाज आणि पाकिस्तानची विमाने भारताच्या हद्दीत येणार नाहीत. आम्ही हेही सांगतो की, पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायला हवे. जी लोकं पाकिस्तानात बसून भारताविरोधात काय काय बोलत आहेत त्यांनी त्यांचे तोंड आरशात बघणे गरजेचे आहे.
भारत तुमच्यापेक्षा ताकदवर आहे..
असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीवरही कठोर शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणाले, तुम्ही कोणत्या मिसाईल टेस्ट करता तर करा पण लक्षात ठेवा, भारत तुमच्यापेक्षा ताकदवर आहे आणि नेहमीच राहील.
विषवल्ली नाहीसी करा
एका रॅलीदरम्यान असदुद्दीन ओवैसी म्हणाले पाकिस्तान एक फेल देश आहे, लक्षात ठेवा ही ताकद भारताला कधीच शांततेत राहू देणार नाही. आपण यांना चोख उत्तर देण्याची आज वेळ आहे. त्यामुळे नेहमीसाठी दहशतवादी विषवल्ली नाहीशी होईल.
याआधी आफ्रिदीचा घेतला समाचार
"भारतात एखादा फटाका जरी फुटतो तर ते याचा दोष पाकिस्तामवर लावतात. काश्मीरमध्ये जवळपास आठ लाख सैनिक आहेत, तरीही पहलगाम हल्ला झाला म्हणजे याचा अर्थ हे सर्व बेकार आहेत. लोकांची सुरक्षा करण्यास सैन्य सक्षम नाही" असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदी म्हणाला होता. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुदोद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीचा समाचार घेतला. ते म्हणाले, त्या जोकरचे नाव नका घेऊ.. एवढे बोलून त्यांनी आफ्रिदीचा विषय संपवला आणि त्याच्यावर ताशेरे ओढले होते.
हेही वाचा : 'सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की...'; हैद्रराबादी टोनमध्ये फडणवीसांचा हल्लाबोल












Click it and Unblock the Notifications