'सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की...'; हैद्रराबादी टोनमध्ये फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis Attacks Asaduddin Owaisi and Akbaruddin Owaisi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे. सत्ताधारी अन् विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार फैरी टाकल्या जात आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेतून एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांच्यावर हैदराबादी भाषेच्या टोनमध्ये बोलत जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात येऊन हल्ली धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेबाचे गुणगाण गायले जात आहेत. पण मी सांगतो, मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं, औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही असदुद्दीन ओवैसींचा फडणवीसांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर...अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर. त्यांच्या विधानानंतर सभास्थळी एकट टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुंबईतील मालाड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांच्यासाठी तर जोगेश्वरी येथे विद्या ठाकुर आणि भारती लव्हेकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी तसेच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 11, 2024
अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर 🇮🇳#MaharashtraElection2024 #Maharashtra pic.twitter.com/pBDygEzkT1
सच्चा मुसलमान औरंगजेबाला मानत नाही
देवेंद्र फडणवीस ओवैसी यांच्यावर टीका करताना म्हणाले, हल्ली ते ओवैसी देखील आपल्या राज्यात, येथील मतदारसंघांमध्ये येत आहेत, फिरत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं है, असे म्हणत फडणवीसांनी ओवैसी यांना चिमटा काढला आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, येथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेबाचे महिमामंडन केले जात आहे. त्या लोकांना मला सांगायचे आहे की भारताचा जो सच्चा मुसलमान आहे, तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. कारण औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्याने आमच्यावर अनेक आक्रमणे केली आहेत. म्हणून मी म्हणतो, अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर...अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर.












Click it and Unblock the Notifications