Gold Price today भारत पाकिस्तान युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठे फेरबदल? आजचे ताजे भाव काय जाणून घ्या
Gold Price today silver rate 11 may 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर सोन्याचे भाव कमी जास्त होत आहे. अशातच सोने लाखांना पोहचले आहे. आज सोन्याचे भाव 3 हजारांनी महागले असून संघर्ष आणि संभाव्य युद्धाच्या तणावामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
दुसरीकडे भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम सोन्यासह शेअर बाजारावरही दिसून आला आहे. गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३,१७० रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात २२ कॅरेट सोन्याचा दर २,९०० रुपयांनी वाढला आहे. सध्या सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या आसपास आहे.

सोने हा सर्वांचा हवाहवाचा असलेला धातू, सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी कमालीच्या वाढल्या आहेत. गेल्या काही काळापासून देशातील सोन्याचा दर हा सर्वोच्च पातळीवर आहे. येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात अशी शक्यता जाणकार व्यक्त करतात.
आज सोने चांदीचे भाव काय?
आज, रविवार 11 मे रोजी सोन्याच्या किमतीत थोडासा बदल दिसून आला आहे, मात्र रविवारच्या दरावर सोने खरेदी करणाऱ्यांवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे. सध्या देशातील सर्व शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,५०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,३०० रुपये आहे.
आज चांदीच्या किमती किती?
सोन्याचे भाव एकीकडे चढताना दिसतात तर चांदीनेही आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. एका आठवड्यात चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या देशात एक किलो चांदीची किंमत ९९,००० रुपये इतकी आहे.
देशातील मुख्य शहरात सोन्याची किंमत किती?
दिल्ली- आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,५०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ९०,३०० रुपये आहे.
मुंबई - मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,३५० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,१५० रुपये आहे.
कोलकाता - कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,१५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,३५० रुपये आहे.
चेन्नई - चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
अहमदाबाद - अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
लखनऊ - लखनऊमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,१५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,३५० रुपये आहे.
हैदराबाद - हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,१५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,३५० रुपये आहे.
गुरुग्राम - गुरुग्राममध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
बंगळुरू - बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
नोएडा - नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९०,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,५०० रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications