Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Adani Group: ट्रम्प यांनी परदेशी लाचखोरी कायद्यावर घातली बंदी, गौतम अदानींना आता सूट मिळेल का?

Adani Group: अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) भारतातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहावर 250 मिलीयन डॉलर (सुमारे 2,000 कोटी रुपये) लाचखोरी प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, राजनैतिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या मुद्द्यावर आता अमेरिकेतील सहा खासदारांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात की ही कृती केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित दिसत नाही तर ती भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधांनाही हानी पोहोचवू शकते. अमेरिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अमेरिका सौम्य भूमिका घेत आहे, तर मग एका भारतीय उद्योगपतीला इतके कठोरपणे का लक्ष्य केले जात आहे, असं अमेरिकन खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

gautam adani

भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि जागतिक ऊर्जा क्षेत्रात अदानी समूहाची महत्त्वाची भूमिका असल्याने ही बाब देखील महत्त्वाची बनते. त्याच वेळी भारत आणि अमेरिका यांच्यात मजबूत व्यापार आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.

अमेरिकन खासदारांनी उपस्थित केला प्रश्न

अमेरिकन काँग्रेसचे खासदार लान्स गुडेन, पॅट फॅलन, माइक हॅरिडोपोलोस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमन्स आणि ब्रायन बाबिन यांनी या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी जनरल पामेला बोंडी यांना पत्र लिहून या तपासाच्या योग्यतेवर आणि वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे पाऊल भारत-अमेरिका राजनैतिक संबंधांना हानी पोहोचवू शकते.

हे राजकीय षड्यंत्र आहे का?

जो बायडेन प्रशासनाच्या काळात अदानी समूहावरील हा आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप कोणत्याही ठोस कारणाशिवाय फेटाळून लावले असताना अदानी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणे हे दुटप्पीपणा दर्शवते. तज्ज्ञांचे मत आहे की, जेव्हा देशांतर्गत अमेरिकन नेत्यांना सुरक्षा दिली जाते तेव्हा भारतीय उद्योगपतीवर इतकी कठोर कारवाई का केली जात आहे?

भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील दुहेरी निकष?

अमेरिकन कंपन्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (FCPA) चे कठोर नियम बंद करण्याचे आदेश दिले होते. ट्रम्प यांनी स्वतः म्हटलं होतं की, हा कायदा व्यवसायासाठी हानिकारक ठरत आहे. जेव्हा अमेरिका जागतिक स्तरावर आपल्या व्यवसायांना फायदा व्हावा म्हणून कायदे शिथिल करू शकते, तेव्हा भारतीय कंपन्यांना कठोर नियमांचा सामना का करावा लागतो?

भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम

अदानी समूहाविरुद्धच्या या कारवाईमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडू शकतात, असं तज्ज्ञांचे मत आहे. सध्या चीनच्या प्रभावाचे संतुलन साधण्यासाठी भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा धोरणात्मक मित्र आहे. अशा परिस्थितीत एका प्रमुख भारतीय उद्योगपतीला लक्ष्य केल्याने अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अमेरिकेच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित करत म्हटलं आहे की, "अशा कृतींमुळे भारतासारख्या महत्त्वाच्या भागीदाराशी असलेले संबंध बिघडू शकतात."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+