मोदी-ट्रम्प भेट : लढाऊ विमानांपासून व्यापारापर्यंत, वाचा या भेटीत भारताला काय मिळाले? 10 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ऐतिहासीक बैठक झाली. त्यात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय भारताची अर्थव्यवस्था बदलणारे ठरणार आहेत. या भेटीतून काय साध्य झाले? भारताला एफ-३५ हे लढाऊ विमाने मिळतील का? या दोन्ही देशांचा व्यापार कोठे पोहोचेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या भेटीतून मिळाले. या भेटीतील दहा प्रमुख मुद्दे आपण पाहूयात...

Modi-Trump meeting

१. द्विपक्षिय व्यापार दुप्पट करणे

मोदी आणि ट्रम्प यांनी २०३० पर्यंत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डाँलरपर्यंत वाढविण्यावर सहमती दर्शवली. मोदी म्हणाले, मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि मेक इंडिया ग्रेट अगेन हे दोघे मिळून मोठी भागिदारी निर्माण करु शकतात. या दोन्ही देशांचे लवकरच अनेक व्यापार करारावर काम सुरु होईल.

२. आरोपींचे प्रत्यार्पण

२००८ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प म्हणाले, या आरोपीला आम्ही भारताच्या स्वाधीन करणार आहोत. तेथे त्याला कायद्यानुसार काय शिक्षा द्यायची ते ठरेल.

३. एफ-३५ मिळतील

संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी मजबूत करत भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने देण्याची घोषणा करण्यात आली. ट्रम्प म्हणाले, या वर्षापासून आम्ही भारताला अब्जावधी डाँलर्सचे संरक्षण तंत्रज्ञान विकणार आहोत. भविष्यात एफ-३५ लढाऊ विमानेही देणार आहोत.

४. एसीईएल सुरु होणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेने एकत्रितपणे ऑटोनाँमस सिस्टम्स इंडस्ट्री अलायन्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जो पुढील दशकात संरक्षण व ऑटोनाँमस सिस्टम क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणार आहे.

५. आयएमईसी काँरिडाँर बांधणार

ट्रम्प म्हणाले, भारत-अमेरिका आयएमईसी काँरिडाँर बांधण्यासाठी एकत्र काम करतील. हा इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक काँरिडाँर असेल. भारतापासून इस्त्रायल, इटली, अमेरिकेपर्यंत व्यापार व कनेक्टीव्हीटी त्यामुळे वाढणार आहे.

६. मोठा ऊर्जा करार

भारताच्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन अमेरिकेने भारताला कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी अक्षय ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची योजना आखली आहे. यामुळे भारताला त्याचे ऊर्जा संसाधने अधिक मजबूत करण्यास मदत होईल.

७. एआय क्षेत्रात सहकार्य वाढेल

भारत आणि अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देश एकत्रितपणे प्रगत एआय प्रणाली विकसित करतील, ज्यामुळे आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि इतर क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतात. या भागीदारीचा फायदा भारतीय स्टार्टअप्स आणि टेक कंपन्यांनाही होईल.

८. व्यापार तूट कमी होईल

अमेरिका आणि भारत यांनी त्यांचा व्यापार असमतोल कमी करण्यास सहमती दर्शविली. ट्रम्प म्हणाले की, व्यापार तूट कमी करण्यासाठी अमेरिका भारतासोबत नवीन करार करेल. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढेल आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

९. अर्धवाहकांच्या विकासावर एकमत

दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर उत्पादन आणि क्वांटम संगणन क्षेत्रात संयुक्त संशोधन आणि विकास करण्यावर सहमती दर्शविली. भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी अमेरिका तांत्रिक सहाय्य करेल. यामुळे भारतातील तांत्रिक उत्पादन क्षमता वाढेल.

१०. अणुभट्टीबाबतही मोठा निर्णय

भारत आणि अमेरिकेने लहान अणु मॉड्यूलर अणुभट्ट्या विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादनाला चालना मिळेल आणि दोन्ही देशांची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+