World laughter day 2025:जागतिक हास्य दिन का साजरा करतात? कधीपासून झाली सुरुवात वाचा महत्व आणि इतिहास
World laughter day 2025 : यंदा 5 मे हा जागतिक हास्य दिन आहे, हा दिवस जगभरातील 70 हून अधिक देश दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात आनंद पसरवणे आहे.
जागतिक हास्यदिनाला जागतिक विनोद दिन असेही म्हणतात. हास्य हे मानवाला दिलेले असे एक वरदान आहे ज्यामुळे माणसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते एवढेच नाहीतर मनातही सकारात्मक विचार येतात आणि हे सकारात्मक विचारच ऊर्जा असतात, अशा विचारांमुळे माणसाचा सर्वांगिन विकास होतो.

जागतिक हास्य दिनाला कधीपासून सुरुवात झाली, या दिनाचे महत्व काय, हा दिन का साजरा करतात याला खास कारण आणि इतिहास आहे हे आज आपण जाणून घेऊया.
महत्व - हास्य सर्वोत्तम औषधापैकी एक (World laughter day 2025)
जागतिक हास्य दिन हे हसण्याचे फायदे आणि आनंदी राहणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करतो. हसणे शरीर आणि मन दोघांसाठीही महत्त्वाचे आहे. खरं तर, हास्य हे जगातील सर्वोत्तम औषधांपैकी एक आहे. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि तुमचा वाईट मूड सुधारते. वेदना कमी करते आणि तणावाच्या हानिकारक प्रभावांपासून तुमचे रक्षण करते.
हास्याचे महत्व समजवण्यासाठी हा दिन साजरा करतात
एका संशोधनानुसार, जो व्यक्ती जास्त हसतो तो जास्त काळ जगतो आणि त्याचे आयुष्य निरोगी आणि आनंदी राहते. म्हणूनच, लोकांना हास्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी दरवर्षी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो.
जागतिक हास्य दिनाचा इतिहास (World laughter day 2025 History)
जागतिक हास्य दिन पहिल्यांदा भारतात 10 मे 1998 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचा पुढाकार जगातील सर्वात मोठ्या 'लाफ्टर योगा'चे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी घेतला होता. मुंबईतील डॉ. मदन कटारिया यांनी हास्यावर संशोधन केले आणि त्यांना असे आढळून आले की हास्यामुळे ताण कमी होतो आणि मानसिक स्थिती देखील सुधारते. डॉ. मदन कटारिया हे भारतातील एक फॅमिली डॉक्टर आहेत. ज्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्या भावनांवर प्रभाव टाकू शकतात. यामुळेच त्यांना हास्य योग चळवळ सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. हास्य योगा चळवळीसह आता 115 हून अधिक देशांमध्ये हजारो हास्य क्लब आहेत. आणि आता तो जगभरात साजरा केला जातो.
जागतिक विनोद दिन साजरा करण्याचा उद्देश
जगभरात शांती आणि सकारात्मकता पसरवणे आहे. हास्याद्वारे बंधुता आणि मैत्रीची जागतिक जाणीव वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील कल्याणाला चालना देण्यासाठी अनेक समुदाय गट नियमितपणे आंतरराष्ट्रीय हास्य तंत्राचा सराव करतात. या सामुदायिक गटांना हास्य क्लब म्हणतात.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications