प्रत्येक प्रवाशाला विमानात पॅराशूट का दिलं जात नाही? यामागची कारणं वाचून तुम्हीही म्हणाल...
विमान अपघाताच्या बातम्या जेव्हा समोर येतात, तेव्हा मनात एकच विचार ठाण मांडून बसतो - जर प्रत्येक प्रवाशाजवळ पॅराशूट असतं, तर कदाचित जीव वाचू शकले असते. अनेकांना हा प्रश्न सतावतो, पण प्रत्यक्षात हे शक्य का नाही, यामागची कारणं समजली की तुम्हालाही त्याचं गांभीर्य लक्षात येईल.

पॅराशूट म्हणजे केवळ एक बॅग नव्हे, त्यामागे आहे वजन आणि जागेचा विचार
प्रत्येक प्रवाशासाठी एक पॅराशूट दिलं, तर त्यासोबत येणारे उपकरणं - हेल्मेट, गॉगल्स, सुरक्षा पट्ट्या - यामुळे संपूर्ण विमानाचं वजन प्रचंड वाढेल. केवळ पॅराशूटच नव्हे, तर त्यासाठी लागणारी स्टोरेज जागाही विमानात सहज उपलब्ध होत नाही. याचा थेट परिणाम म्हणजे जास्त इंधनाचा वापर आणि तिकिटांचे दर आकाशाला भिडणं.
अत्युच्च उंचीवरचा धोका, विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन
सामान्य स्कायडायव्हिंगसाठी १५ ते २० हजार फूट उंची योग्य मानली जाते. पण व्यावसायिक विमानं ३०,००० फूट किंवा त्याहून अधिक उंचीवरून उडतात. अशा ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याने पॅराशूटने उडी मारणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. थंडीचा तीव्र झटका, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि हायपॉक्सिया यांसारखे जीवघेणे परिणाम होऊ शकतात.
पॅराशूट वापरणं म्हणजे तांत्रिक कौशल्य, सर्वसामान्य प्रवासी यासाठी तयार नसतात
पॅराशूट वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असतं. कोणत्या कोनातून उडी मारायची, हवेत आपली स्थिती कशी नियंत्रणात ठेवायची, आणि जमिनीवर कशा पद्धतीने उतरणं यासाठी कौशल्य लागतं. सर्वसामान्य प्रवाशांकडे हे ज्ञान नसल्याने आपत्तीच्या क्षणी चुकीच्या पद्धतीने उडी मारल्यास परिणाम अधिक भीषण होऊ शकतो.
आपत्कालीन प्रसंगात वेळ आणि संयम, हे दोनही घटक नसतात
विमान अपघाताचं दृश्य अत्यंत वेगाने घडतं. अशा घाईच्या प्रसंगी शेकडो प्रवासी एका वेळी पॅराशूट घालून, सीमित दरवाजांमधून व्यवस्थित बाहेर पडतील, अशी अपेक्षा ही केवळ कल्पनेपुरतीच शक्य आहे. अशावेळी गोंधळ, अफरातफर आणि चुकीच्या कृतीमुळे जीव धोक्यात येऊ शकतो.
विमानाची रचना पॅराशूटसाठी योग्य नाही
प्रवासी विमानांचे दरवाजे आणि संरचना ही पॅराशूटसाठी डिझाइन केलेली नसते. विमानाचा प्रचंड वेग, विंग्ज आणि इंजिनचा जोर - हे सर्व घटक कोणत्याही प्रवाशाच्या सुरक्षित उडीला अडथळा ठरतात. त्यामुळे पॅराशूट वापरून बाहेर पडणं केवळ अव्यवहार्यच नाही, तर जीवावर बेतणाराही प्रयोग ठरू शकतो.
तर मग सुरक्षेची खात्री कशामध्ये?
यापेक्षा सुरक्षिततेसाठी फ्लाइट इंजिनिअरिंग, नियमित देखभाल, ट्रेन्ड क्रू, आणि योग्य आपत्कालीन प्रोटोकॉल यावर भर दिला जातो. विमानात सीट बेल्ट, लाईफ जॅकेट, आणि इमर्जन्सी स्लाइड्ससारखी उपकरणं हीच योग्य वेळी अधिक उपयुक्त ठरतात.
पॅराशूट ही संकल्पना रोमांचक वाटू शकते, पण व्यावसायिक विमानांसाठी ती अतिशय अव्यवहार्य आहे. सुरक्षिततेसाठी योग्य उपाय आणि प्रक्रियांवर विश्वास ठेवणं, हेच खरेद्वारे आपल्या प्रवासाचा शहाणा निर्णय ठरतो.












Click it and Unblock the Notifications