कोण आहे सोनम सोनम वांगचुक? का झाली त्यांना अटक, थ्री इडियट सिनेमाबाबत काय आहे स्टोरी जाणून घ्या
Who is Sonam Wangchuk Why was he arrested : जम्मू काश्मीरमधील पर्यावरणवादी, सामाजिक कार्य करणारे नेते सोनम वांगचुक यांना अटक झाली आहे. सोनम वांगचुक गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. यादरम्यान, आंदोलकांनी हिंसक कृत्य केल्याचा आरोप लावण्यात आला असून या आंदोलनादरम्यान लेहमध्ये हिंसेचा भडका उडाला. याप्रकरणात सोनम वांगचुक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

का झाली सोनम वांगचुक यांना अटक?
लडाखला संवैधानिक हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण मिळावे यासाठी वांगचुक यांनी आमरण उपोषण केले. लेहमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हिंसक कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेच्या प्रकरणात सामाजिक आणि शैक्षणिक नेते कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना अटक झाली. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार सोनम वांगचुक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
कोण आहेत सोनम वांगचुक?
१ सप्टेंबर १९६६ रोजी जन्मलेले सोनम वांगचुक हे केवळ एक अभियंता (इंजिनियर) किंवा शिक्षण सुधारक नाहीत, तर ते भारताच्या नवकल्पना (इनोव्हेशन) क्षेत्रातील एक जागतिक 'आयकॉन' आहेत.
सोनम वांगचुक यांचे कार्य
१९८८ मध्ये, लडाखवर लादलेल्या परदेशी शिक्षण प्रणालीचे 'बळी' असलेल्या विद्यार्थी समूहाने मिळून 'स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' ची स्थापना केली. सोनम वांगचुक हे त्याचे संस्थापक-संचालक आहेत.
सेकमोल कॅम्पसची रचना
वांगचुक यांनी एसईसीएमओएल कॅम्पसची रचना अशी केली आहे की तो संपूर्णपणे सौर-ऊर्जेवर चालतो. स्वयंपाक, वीज किंवा गरम हवा यासाठी येथे कोणत्याही जीवाश्म इंधनाचा वापर होत नाही. १९९४ मध्ये, सरकारी शाळांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी सरकार, ग्रामीण समुदाय आणि नागरिक समाज यांच्या सहकार्याने "ऑपरेशन न्यू होप" सुरू केले.
पर्यावरणवादी कार्य
लडाखच्या वाळवंटीय प्रदेशात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सोनम वांगचुक यांनी बर्फ-स्तूप तंत्रज्ञानाचा शोध लावला. शंकूच्या आकाराचे हे बर्फाचे ढिगारे हिवाळ्यातील पाणी साठवण्यासाठी वापरले जातात, जे उन्हाळ्यात शेतीसाठी उपयोगी ठरते.
थ्री इडियट सिनेमाशी काय आहे संबंध
लोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट 'थ्री इडियट्स' हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटात आमिर खानने 'फुंगसुक वांगडू' हे अविस्मरणीय पात्र साकारले होते. वांगचुक यांचे कार्य लडाखमधील पारंपरिक शिक्षण प्रणालीत क्रांती घडवणारे ठरले आहे.
१४ दिवसांपासून उपोषण-आंदोलन
शिक्षण आणि पर्यावरणासाठी कार्यरत असलेले सोनम वांगचुक हे अलीकडील काळात त्यांच्या सामाजिक आंदोलनामुळे चर्चेत आले. लडाखला संवैधानिक हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांचे हे उपोषण समाप्त झाले आहे. लडाखच्या राजकीय आणि पर्यावरणीय हक्कांसाठी त्यांनी दिलेला हा लढा खूप महत्त्वाचा ठरला आहे.












Click it and Unblock the Notifications