Justice BR Gavai : कोण आहेत न्यायमूर्ती बी. आर. गवई? सुप्रिम कोर्टाचे होणार 52 वे सरन्यायाधीश

Who Is Justice BR Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रीय कायदा मंत्रालयाने ही शिफारस मान्य केल्यास, न्यायमूर्ती गवई 14 मे रोजी नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागा नवीन सरन्यायधीश घेतील.

Who Is Justice BR Gavai

बी. आर. गवई असतील दुसरे दलित सरन्यायाधीश

न्यायमूर्ती गवई देशाच्या इतिहासातील दुसरे दलित सरन्यायाधीश बनणार आहेत. त्यांच्या आधी, न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन हे 2007 मध्ये पहिले दलित सरन्यायाधीश होते. ही नियुक्ती भारतीय न्यायव्यवस्थेतील सामाजिक समावेशाचे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती गवई?

  • न्यायमूर्ती गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी 16 मार्च 1985 रोजी वकील म्हणून नोंदणी केली.
  • कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू केली.
  • नागपूर खंडपीठात प्रामुख्याने घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी आपली वकिली सुरू ठेवली आणि नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठात सल्लागार म्हणूनही काम केले.
  • बी. आर. गवई यांचा न्यायाधीश म्हणून अनुभव
  • 14 नोव्हेंबर 2003 रोजी बी.आर. गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली.
  • उच्च न्यायालयातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पनाजी खंडपीठांमध्ये न्यायालयीन कामकाजात भाग घेतला. त्यांची नियुक्ती 24 मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
  • न्यायमूर्ती गवई यांची नियोजित सेवानिवृत्ती तारीख 23 नोव्हेंबर 2025 आहे, म्हणजे ते सुमारे सहा महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने संजीव खन्ना यांनी त्यांची निवड केली.

न्यायमूर्ती गवई यांची महत्त्वाच्या निकालांमध्ये भूमिका

सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निकालांशी न्यायमूर्ती गवई यांचे नाव जोडले गेले आहे. यामध्ये 2016 च्या नोटाबंदीचा निर्णय कायम ठेवणे. आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे. या निकालांमध्ये त्यांची मते न्यायालयीन दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली गेली आहेत. आणि यावेळी सरन्यायाधीश म्हणून ते आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+